सहा शहिदांच्या स्मृती तुमसरकरांच्या कायम स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:17 PM2018-08-13T22:17:53+5:302018-08-13T22:18:11+5:30

भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते.

In memory of six martyrs remembered Tuskers | सहा शहिदांच्या स्मृती तुमसरकरांच्या कायम स्मरणात

सहा शहिदांच्या स्मृती तुमसरकरांच्या कायम स्मरणात

googlenewsNext
ठळक मुद्देशहीद दिन विशेष : स्वातंत्र्यापूर्वीच १९२९ साली फडकला तिरंगा, महात्मा गांधींनी दिली होती भेट

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : भारतीय स्वातंत्र्य संग्राम चळवळीत तुमसर शहरासह तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी शहीद दिनी आंदोलन करून प्राणाचे बलिदान दिले. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासन दप्तरी नोंद आहे. तुमसर स्वातंत्र्य युद्धातील मुख्य केंद्र होते. तुमसरातून धान्य बाहेर जात होते ते जाऊ नये म्हणून येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी सत्याग्रह सुरू केला होता. ही ऐतिहासिक घटना तुमसरात घडली. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तुमसरात सहा जण शहीद झाल्याची घटना देशात गाजली.
धान्य विरोधात बापूराव पेंढारकर, कृष्णअप्पा दाजोट्या व छोटू पहेलवान यांना अटक करून त्यांच्यावर ब्रिटीशांनी खटला भरला. प्रसिद्ध बॅरिस्टर नरकेसरी अभ्यंकर यांनी पुढाकार घेऊन त्यांची सुटका केली. महात्मा गांधीनी सुरू केलेल्या अहसहकार आंदोलनात कर्मवीर बापूजी र.रा. पाठक यांनी वकीली सोडली. राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून तुमसरात लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना १९२० मध्ये केली. राष्ट्रीय शाळेची जबाबदारी माकडे गुरूजीकडे देण्यात आली. येथे स्वातंत्र्याची प्रेरणा देणारे शिक्षण बुधराम गुरूजी, वैरागडे गुरूजी, जोशी गुरूजी, मो.प. दामले, रामअण्णा गुरूजी सातत्याने दिले. त्यामुळे तुमसर व तुमसर विभागात इंग्रजांच्या विरोधात अनेक चळवळींना धार आली.
महाराष्ट्रात येण सत्याग्रहात तुमसरचे विनायक पेंढारकर यांना ३ महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा झाली. येवरडा तुरूंगात नियमांना विरोध केल्याने त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली. प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. १९२३ मध्ये झेंडा सत्याग्रहात तुमसरचे मो.प. दामले, लक्ष्मण समरीत, सिहोऱ्याचे गोपीचंद पाटील तुमसर यांनी सत्याग्रहात भाग घेतला. सायमन कमीशनवर बहिष्कार संदर्भात सन १९२७ मध्ये महात्मा गांधी, जमनालाल बजाज, डॉ. लोहीया तुमसरात आले होते. त्यांचा मुक्काम सेठ फत्तेचंद मोर यांच्या घरी होता. महात्मा गांधीनी राष्ट्रीय विद्यालयाला भेट दिली.
तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा झेंडा फडकविण्याकरीता सेठ नरसिंगदास मोर यांनी २ आॅक्टोबर १९२९ ला नोटीस दिली होती. त्याकरिता झेंड्याकरीता युद्धमंडळ स्थापन करण्यात आले होते. मो.प. दामले, सचिव वासुदेव कोंडेवार तथा सदस्यांनी मोर्चेबांधणी केली. वामनराव जोशी यांचे हस्ते तिरंगाध्वज नगर परिषदेवर प्रथमच फडकला.
१९३० मध्ये जंगल सत्याग्रहात पोलिसांनी लाठीचार्ज व धरपकड केली. पोलीस घोडे व हत्तीवर बसून आणण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वानरसेना स्थापन करण्यात आल्या होत्या. १० आॅगस्ट १९४२ रोजी पोलिसांनी १४ नेत्यांविरोधात अटक वारंट काढला होता. काही नेते भूमिगत झाले होते. तुमसर पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्ते तिरंगाध्वज लावण्याकरिता गेले होते. मिरवणूक अडवून पोलिसांनी गोळभबाळ केला त्यात श्रीराम रामजी धुर्वे, भदुजी रामाजी नोंदासे, श्रीहरी काशीनाथ फाये करडी, पांडूरंग परसराम सोनवाल, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पेकू धुर्वे हे सहा जण मृत्युमुखी पडले. ब्रिटीशांनी सेनेला तुमसरात पाचारण केले होते. दामले गुरूजी, वासुदेव कोंडेवार, आनंदराव चकोले, नारायणराव कारेमोरे, भोले यांना पकडून तुरूंगात डांबले.
सन १९९० मध्ये भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुमसर येथे आले होते. त्यांनी सहा शहीदांच्या स्मारकाकरिता जागा देवून शहीद स्मारकाचे भूमीपूजन केले होते. तुमसरात मोतीलाल नेहरू, महात्मा भगवान दासजी पंडित सुंदरलाल, आचार्य कृपलानी, डॉ. पट्टीमोसिता रामय्या, जयप्रकाश नारायण, क्रांतीवीर नाना पाटील, काकासाहेब गाडगीळ आदी नेत्यांनी भेटी दिल्या आहेत.

Web Title: In memory of six martyrs remembered Tuskers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.