पुरुषांमध्ये यश, महिलांमध्ये मयुरी अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:04 PM2018-03-12T23:04:20+5:302018-03-12T23:04:20+5:30
भंडारा शहरात दि इव्हाल्युशन मष्टिपरपज फाऊंडेशन भंडारा व भंडारा सायकल ग्रुपतर्फे आयोजित सायकल स्पर्धा सायक्लोथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा शहरात दि इव्हाल्युशन मष्टिपरपज फाऊंडेशन भंडारा व भंडारा सायकल ग्रुपतर्फे आयोजित सायकल स्पर्धा सायक्लोथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरूष खुला गट, महिला गट व वयस्क गट अशा तीन वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपुरच्या यश शर्मा तर बेला येथील मयुरी लुटे हिने अव्वल स्थान पटकाविले.
स्वास्थ, पर्यावरण आणि एकता या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली, असे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेत फक्त भंडारातीलच नव्हे तर नागपूर, अमरावती, अकोला, रायगड, यतवमाळ, चंद्रपूर, वर्धा तसेच छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथून देखील स्पर्धकांनी हजेरी लावली. स्पर्धेत एकूण २२० स्पर्धकांनी हजेरी लावली. यात पुरूष १३०, महिला ६६ आणि वयस्क २४ सायकलस्वार उपस्थित होते. शहरातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली.
पुरूष खुल्या गटातील यश शर्मा याने प्रथम क्रमांक पटकाविला व द्वितीय क्रमांकावर वर्धाचे प्रशांत काळबांधे राहिले. तसेच तृतीय क्रमांक हर्षल शिंदे वर्धा याने पटकाविला. महिला गटात भंडारा शहरातील बेला येथील मयुरी लुटे हिने प्रथम क्रमांक पटकावित जिल्ह्याचे नाव उंचाविले. दुसºया क्रमांकावर चैताली शिवणकर रायगड राहिली आणि प्रियंका चिंबुळकर रायगड हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
याशिवाय अमरावती येथील सायकली काळे हिने सर्व खेळाडूंपुढे उत्कृष्ठ खेळाडूंचे प्रदर्शन मांडले. वयस्क गटात भंडारा जिल्ह्यातील गुमथळा येथील राजकुमार नंदेश्वर यांचा प्रथम, आणि द्वितीय भंडाराचेच देवराव बांते राहिले आणि नागपूर येथील गुलाब अत्राम यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत आयोजक डॉ. ओमप्रकाश गिरीपुंजे, डॉ. योगेश जिभकाटे, पंकज हरडे, प्रशांत ढाले, ओमकार नखाते, रोहित वानखेडे, अमोल मानापुरे, प्रणय चिमणकर, प्रकाश नवघरे, आशिष महाकाळकर, डॉ. मुनिश्वर भोंगाडे, विनोद येळणे, उल्लास जिभकाटे, आनंद मैदमवार, धनंजय अतकरी यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्विपणे पार पडली.