पारा ४४.५ सेल्सिअस अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:21 PM2018-04-30T23:21:24+5:302018-04-30T23:21:34+5:30
शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, ‘मे’ हिटचा फटका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बसला होता. सोमवारला शहराचे तापमान ४४. ५ अंश सेल्सिअस असल्याने भंडारेकर चांगलेच घामाघूम झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, ‘मे’ हिटचा फटका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बसला होता. सोमवारला शहराचे तापमान ४४. ५ अंश सेल्सिअस असल्याने भंडारेकर चांगलेच घामाघूम झाले आहेत.
वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्याने नागरिकांना बाहेर पडले टाळताहेत. उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी एसी, कूलर पंख्यांचा वापर वाढला आहे, तर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. एप्रिल महिन्याच्या आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे.
मागील तीन दिवसांपासून पारा वाढला असून, तो सोमवारी ४४.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पारा हा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. रणरणत्या उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. येणाऱ्या पाच दिवसापर्यत उष्णतेत कमालिची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मे महिन्यात वाढणाºया तापमानामुळे वृद्ध आणि लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे.
तापमानाने केली जिवाची लाहीलाही
घराबाहेर जावे तर उन्हाच्या झळा, घरात थांबावे तरी घामाच्या धारा, कूलरने दिलासा मिळेना अन् उष्णतेच्या तडाख्यामुळे क्षणभर चैन पडेना! यावर्षी मार्चपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या. एप्रिल महिन्यात असह्य केलेल्या उन्हाच्या झळा बसत आहे. अगदी सकाळपासूनच उकाडा वाढू लागला. दुपारी दोनच्या सुमारास तर भट्टीजवळून चालतोय की काय? असा अनुभव येत आहे.
एप्रिल महिना असा असहृय असताना आता आजपासून ‘मे’ हिटची जाणीव प्रकर्षाने होणार आहे. सोमवारला यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस ४५ अंश तापमान नोंदविण्यात आले. अंगाची लाहीलाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत ऊष्ण वारे वाहत असून वाढत्या उन्हाचा फटका माणसांसोबतच जनावरे आणि पशुपक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे.