भर पावसात मेरिट बचाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:13 PM2019-07-30T22:13:41+5:302019-07-30T22:14:14+5:30
राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
सार्वसामान्य वर्गातील नागरिकांसाठी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. सर्वौच्च न्यायालयाने १९९२ च्या नयना सहानी प्रकरणात शिक्षण तसेच नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि ५० टक्के वाटा मेरिट, पात्रता, प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला होता. यामागे देशाचा विकास व्हावा हा हेतू होता. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य वर्ग तसेच मेरिट करीत ४८ टक्के पदांमध्ये तूट करून आरक्षण घोषित केले. यामुळे राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तरुण मुले मुली नैराश्याच्या छायेत जात आहेत, असे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनचा लढा जाती किंवा आरक्षणाविरुद्ध नसून देशात योग्यतेचे महत्व वाचविले पाहिजे यासाठी आहे. या मोहिमेंतर्गत भंडारातील सर्व खुल्या प्रवर्गातील लोकांनी येथील त्रिमूर्ती चौकात एकत्र येऊन अतिरिक्त जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या भर पावसात या आंदोलनात नागरिक छत्र्या घेऊन सहभागी झाले होते. महिलांची यात लक्षणीय उपस्थिती दिसत होती. तुमसर तालुक्यातील नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाला नागपूर येथील विनोद फाफट, नवीन चांडक, डॉ.अर्चना कोठारी यांनी मार्गदर्शन केले. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन भंडारा जिल्हा कृती समितीतर्फे डॉ.गोपाल व्यास, किरिट पटेल, डॉ.मोनिका बत्रा, रामविलास सारडा, जयेश संघानी, दिशा अग्रवाल, तुलसी सारडा, शैला शर्मा, पंकज मुंदडा आदी सहभागी झाले होते.
सिंधी समाज, पंजाबी समाज, गुजराती समाज, मारवाडी समाज, ब्राम्हण समाज, माहेश्वरी युवा संघटनेचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर पावसात झालेल्या या आंदोलनाने भंडाराकरांचे लक्ष वेधून घेतले होते.