चित्रकला स्पर्धेतून गिधाड वाचविण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:20 PM2018-09-10T22:20:30+5:302018-09-10T22:20:48+5:30
येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे जागतिक गिधाड दिनाच्या निमित्ताने १ ते ७ सप्टेंबर गिधाड जागृती आठवडा साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे जागतिक गिधाड दिनाच्या निमित्ताने १ ते ७ सप्टेंबर गिधाड जागृती आठवडा साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व नागरिकांमध्ये नष्टप्राय होत असलेल्या दुर्मिळ गिधाड पक्षाविषयी जनजागृती होण्याकरिता दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या चित्रकला स्पर्धेमध्ये सिद्धार्थ विद्यालय सावरीचे हरित सेनेचे विद्यार्थी तसेच राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे हरित सेना विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी ग्रीनफ्रेन्डस्चे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी उपस्थित स्पर्धक विद्यार्थ्यांना गिधाड पक्ष्याची संख्या कमी होण्यामागची कारणे समजावून दिलीत. यात प्रामुख्याने जनावरांना डायक्लोफेनॅक नावाच्या औषधीमुळे त्यांची प्रजनन शक्ती क्षीण होणे, मेलेले जनावर गिधाड पक्ष्यांना उपलब्ध न होणे व त्यांचे अधिवास असलेले क्षेत्रामध्ये पर्यावरणीय संकट येणे हे प्रमुख कारणे त्यांनी स्पर्धकांना पटवून दिली.
ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी व सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार, सिद्धार्थ विद्यालयाचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे व ग्रीनफ्रेन्डस् पदाधिकारी अशोक वैद्य यांनी दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धेविषयी रेखाटन, माहिती, रंगकाम व भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख गिधाड प्रजातीचे माहिती याबद्दल माहिती पुरविली.
यानंतर स्पर्धक विद्यार्थ्यांनी पाल्या पुठ्ठ्याचे गिधाड, भारतीय गिधाड, युरेशियन गिधाड व राजगिधाड यावर आधारित चित्रे रंगवून सादर केलीत. सिद्धार्थ विद्यालय सावरी मधून प्रथम क्रमांक जान्हवी भुरे हिला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक प्रतीक राऊत, नेहा चाचेरे यांना प्राप्त झाला. तर तृतीय क्रमांक रूचिता गायधनी, संजना मेहर व मुशर्रफ शेख यांना प्राप्त झाला. राणी लक्ष्मी कन्या विद्यालय लाखनी मध्ये मिडलस्कुल गटातून प्रथम क्रमांक गायत्री वैद्य हिला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक मनस्वी गभणेला तर तृतीय क्रमांक चेतना फंदे व स्वीटी लांजेवार यांना प्राप्त झाला.
हायस्कुल गटामधून प्रथम क्रमांक सुहानी भोवते हिला तर द्वितीय क्रमांक नित्या नवखरे, पियुषा भलावी यांना प्राप्त झाला. तृतीय क्रमांक प्रांजली उईके हिला प्राप्त झाला. महर्षी विद्या मंदिर भंडाराचा विद्यार्थी पुष्कर सोलंकी याला प्रथम तर पोदार इंटरनॅशनल स्कुल भंडाराचा विद्यार्थी अथर्व गायधने याला द्वितीय क्रमांक तर एमडीएन फ्युचर स्कुल लाखनीचा विद्यार्थी अर्णव गायधने याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. समर्थ विद्यालय लाखनी मधून प्रथम क्रमांक वज्रेश मेश्राम याला प्राप्त झाले तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे भूषण धांडे, अमन लांजेवार व रोहित देशमुख यांना प्राप्त झाला.
स्पर्धेचे परीक्षण ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी दिनकर कालेजवार, अशोक वैद्य, सिद्धार्थ विद्यालय सावरीचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य धनंजय तिरपुडे, राणी लक्ष्मी कन्या विद्यालय मुख्याध्यापिका संध्या हेमणे, हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, समर्थ विद्यालय प्राचार्य दा.ई. प्रधान, हरित सेना शिक्षक अनिल बडवाईक यांनी स्पष्ट केले. विजेत्या स्पर्धेकांना येत्या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.