‘दानपेटी’तील निधी आराेग्यावर खर्च करण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:56+5:302021-05-22T04:32:56+5:30
तुमसर : श्रद्धा आणि आस्थेने प्रत्येक जण धार्मिक स्थळावरील दानपेटी ऐपतीप्रमाणे दान करताे. या दानातून मंदिराचा विकास हाेताे. अनेक ...
तुमसर : श्रद्धा आणि आस्थेने प्रत्येक जण धार्मिक स्थळावरील दानपेटी ऐपतीप्रमाणे दान करताे. या दानातून मंदिराचा विकास हाेताे. अनेक मंदिरं सामाजिक उपक्रमही हाती घेतात. आता काेराेना संकटात दानपेटीत जमा झालेला पैसा आराेग्यावर खर्च करावा, असा संदेश तुमसर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघुचित्रपटातून देण्यात आला आहे. हा चित्रपट साेशल मीडियातून चांगलाच व्हायरल झाला असून, त्याची मुंबईपर्यंत चर्चा सुरू आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात भयभीत वातावरण निर्माण झाले हाेते. अनेक विद्यार्थी शिक्षण साेडून मूळ गावी परतले. तुमसर येथील असेच अनेक विद्यार्थी गावी आले. त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात गाेरगरिबांच्या अडचणी आणि आराेग्य सुविधांसाठी धडपड बघीतली. यातून या मित्रांनी समाजाला संदेश देणारा लघु चित्रपट तयार करण्याचे ठरविले. त्यांनी धार्मिक स्थळावरील ‘दानपेटी’तील पैशाला मध्यवर्ती कल्पना समजून लघु चित्रपटाची टीम तयार केली; परंतु लघुचित्रपट तयार करण्यासाठी पैशा नव्हता. यासाठी त्यांनी परिसरातील राजकीय नेत्यांशी संपर्क साधला. त्यांची संकल्पना त्यांना आवडली. आर्थिक मदत देण्याचे कबूल केले आणि लघु चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली.
अनिकेत कांबळे यांच्या दिग्दर्शनात चित्रपटाचे संवाद लिहिल्या गेले. तुमसर तालुक्यातीलच चित्रिकरणाचे स्थळ निश्चित करण्यात आले. संकटकाळात देव कसा मदतीकरिता धावून येताे, हे या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपटातील कथानक आणि चित्रीकरण डाेळ्याचे पारणे फेडणारे आहे. या चित्रपटाच्या कथा व संकल्पनेचे काैतुक मुंबईतील रसीकांनीही केले आहे. या विद्यार्थ्यांना उडाण संस्थेच्या संस्था कल्याणी भुरे यांनी बळ व प्रेरणा दिली.
बाॅक्स
ही आहे महाविद्यालयीन कलावंत मंडळी
‘दानपेटी’ या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत कांबळे यांनी केले असून, यात मिलिंद मदनकर, माेसम वानखेडे, प्रतीक ढाेमणे, विपीन लांजेवार, अक्षय देशमुख आदित्य साेनवने, तपन साेनी, वसीम शेख, हर्षल शेंडे, बाॅबी ढेंगे, सुरज लांजेवार, महादेव मलेवार, मुकुंद साेनवाने, राेशन सावरकर, हुशार आगाशे, यश नागलवाडे, दुर्गेश मलेवार, नयना भैसारे, राेहणी परतेती, पायल परतेती, आर्या खाेब्रागडे, मीनल मानवटकर, दीपाली बडवाईक, आराध्या सहारे, सिमरन बाेरकर, पूजा आतीलकर, निशिधा चाेपकर, आचल बांडेबुचे, अंकिता बांडेबुचे, ऐश्वर्या गुरव, सानिया साठवणे, दिशा लांजेवार, मनीषा मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.