भ्रमणध्वनीवर उपायांचे संदेश

By admin | Published: September 21, 2015 12:24 AM2015-09-21T00:24:11+5:302015-09-21T00:24:11+5:30

धान पिकावरील किडींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर उपाय योजनाचे संदेश पाठविले जात आहेत.

Messages of mobile phone remedies | भ्रमणध्वनीवर उपायांचे संदेश

भ्रमणध्वनीवर उपायांचे संदेश

Next

औषधांचा पुरवठा नाही : धानावर किडींचा प्रादुर्भाव, शेतकरी त्रस्त
लोकमत विशेष

रंजीत चिचखेडे चुल्हाड (सिहोरा)
धान पिकावरील किडींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर उपाय योजनाचे संदेश पाठविले जात आहेत. परंतु या किडीवर रामबाण उपाय ठरणारी औषध ग्राम कृषी विभागात उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे सिहोरा परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पीक आहे. या पिकाला चांदपुर जलाशय आणि सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची संजीवनी मिळाली आहे. अंदाजे १२ हजार हेक्टर आर शेत शिवारात धानाची रोवणी करण्यात आली आहे. हलक्या प्रतीचे धानाचे पीक गर्भात आले असून अन्य धानाचे पीक याच उंबरठयावर आहे. आधी निसर्गाने पावसाची दगाबाजी दिली आहे. आता या धानाला शासनाची अवकृपा लागली आहे. धानाचे पिक गर्भात आले असतांना खोडकिडा, गादमाशी आणि कडपा या किडींचा प्रादुर्भावाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. किडीचा नायनाट करणाऱ्या औषधांची शोधाशोध शेतकरी व त्यांचे कुटूंब करीत आहे.
खाजगी कृषी केंद्रात औषध खरेदीसाठी शेतकऱ्यांची रांग लावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु शेतकऱ्यांचे शिलेदार बेपत्ता झाली आहेत. धानपिकावरील किडीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी वर उपाय योजना एसएमएस मधून सांगितल्या जात आहेत. दिवसभर एकामागे एक असे संदेश प्राप्त होत आहेत. असे संदेश वाचून शेतकऱ्यांची डोकी खाजवायला लागली आहेत. या संदेशात औषध व उपाय योजनांची माहिती असली तरी, औषध स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे ठिकाण मात्र सांगण्यात येत नाहीत.
शेतकऱ्यांचे हित आणि उपाय योजनाचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय कृषी विभाग, तथा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. सिहोऱ्यात राज्याचे अखत्यारित मंडळ कृषी कार्यालय संचालित होत आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे दोन्ही कार्यालय आहेत. या कार्यालयाचे यंत्रणेवर शासन शेतकऱ्यांचे हितासाठी महिन्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु या खर्चित निधीचा उपयोग होत नाही.
धान पिकांचे किडीच्या प्रादुर्भावाने अतोनात नुकसान सुरु झाले आहे. या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. या धानाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु झाली आहे. संदेश वाचन केल्यानंतर शेतकरी थेट औषधीकरिता मंडळ कृषी कार्यालयाचे दरवाज्यावर थाप देत आहेत. अद्याप औषधांचा पुरवठा करण्यात आला नाही असे एकच उत्तर शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत. या उत्तराने शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही. समस्या व अडचणी सोडविणारी मेट्रो धावली पाहिजे.
सिहोऱ्याच्या मंडळ कृषी कार्यालयाने मे महिन्यात शेतकऱ्यांचे हितासाठी औषध व स्प्रे पंप अन्य उपकरणे पुरवठा करणारा प्रस्ताव दिला आहे. तब्बल ५ महिन्यांपासून या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला नाही, धान पिकावर रामबाण ठरणारी औषधाची पुरवठा करण्यात आला नाही. खाजगी कृषी केंद्रावर या औषधी उपलब्ध असतांना शासनाच्या कृषी विभागात औषध उपलब्ध नाही. ही बाब शेतकऱ्यांना खटकणारी आहे.

धानाचे उत्पादन वाढणार
सिहोरा परिसरात धान पिकाला संजीवनी चांदपुर जलाशयात २७ फुट पाण्याची साठवणुक झाली असून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प नदीपात्रातून पाण्याचा उपसा करीत आहे. यामुळे धान पिकाला गरजेनुसार पाणी मिळणार असले तरी, धान पिकावरील किडींचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाने औषधांचा आधार दिला पाहिजे.

सिहोरा परिसरात धानावरील किडींचा प्रादुर्भावाने शेतकरी हैराण झाली आहेत. कृषी विभाग (राज्य) आणि कृषी कृषी विभाग (जि.प.) दोन्ही विभागात अद्याप औषधांचा पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांची लुट होत आहे.
- अरविंद राऊत,
सदस्य पंचायत समिती, सिहोरा
मंडळ कृषी कार्यालयाला औषध व अन्य साहित्य पुरवठा करण्यासाठी शासनाला मे महिण्यात प्रस्ताव दिला आहे. पंरतु अजूनपर्यंत औषध साहित्य प्राप्त झाले नाही.
- एस. जी. उईके,
मंडळ कृषी अधिकारी सिहोरा

Web Title: Messages of mobile phone remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.