वीज ग्राहकांना स्वत: पाठविता येणार मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:36 AM2021-04-27T04:36:21+5:302021-04-27T04:36:21+5:30
भंडारा : कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असल्याने संचारबंदी आहे. अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहेत. अशा ठिकाणी ...
भंडारा : कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असल्याने संचारबंदी आहे. अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहेत. अशा ठिकाणी मीटर रीडिंग घेणे महावितरणला शक्य नाही. त्यामुळे वीज ग्राहकाला स्वत:हून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीने कळविले आहे.
महावितरणकडून केंद्रिकृत वीज बिल प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघु दाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकाच्या वीज बिलावर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वत:हून रीडिंग पाठविण्यासाठी एसएमएसद्वारे विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसापर्यंत ग्राहकांना मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येणार आहे.