भंडारा उपविभागात पूरनियंत्रणाचे सूक्ष्म नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:36+5:302021-06-11T04:24:36+5:30
भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड आणि तहसीलदार अक्षय पाेयाम यांनी भंडारा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यात पिंडकेपार, काेरंभी, ...
भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड आणि तहसीलदार अक्षय पाेयाम यांनी भंडारा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यात पिंडकेपार, काेरंभी, सालेबर्डी, खैरीपा, कारधा, सालेबर्डी सारसाळ, खापा, आझीमाबाद, करचखेडा, खमारी या गावांचा समावेश आहे. गावातील सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. नदीला पूर आल्यास काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसेवकांनी गावकऱ्यांच्या संपर्कात राहून अतिवृष्टी किंवा पुरामुळे उद्भवणाऱ्या पुराच्या परिस्थितीची माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले.
बाॅक्स
या गावांचा तुटताे पुरामुळे संपर्क
वैनगंगा आणि इतर नद्यांना येणाऱ्या पुरामुळे जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटताे. त्यात भंडारा तालुक्यातील अर्जुनी काेरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द या गावांचा समावेश आहे. यासाेबतच भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते काेरंभी रस्ता, भिलेवाडा ते सुरेवाडा, सिंधी काॅलनी ते मेंढा रिंगराेड, कारधा बायपास हे मार्ग बंद हाेतात, तर पवनी तालुक्यातील नेरला ते सावरगाव, पहेला ते आंभाेरा, पवनी ते जुनाेना, मांगली ते वलनी आणि पवनी ते धानाेरी या गावांचा समावेश आहे. या गावांवर महसूल विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.
काेट
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पूरबाधित गावांत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. नागरिकांना संभाव्य धाेका वाटत असेल आणि सूचना मिळाल्यावर त्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यांचा आश्रय घ्यावा. पूरपरिस्थितीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. अनेकदा घरातील महिला आणि लहान मुलांना सुरक्षितस्थळी पाठविले जाते. परंतु, पुरुष घरातच थांबताे. पूरपरिस्थितीत जीव वाचविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.
-रवींद्र राठाेड, उपविभागीय अधिकारी भंडारा