मतदान प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:10 AM2019-04-08T01:10:22+5:302019-04-08T01:10:43+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत.

Microscopic monitoring of the polling process is necessary | मतदान प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक

मतदान प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक

Next
ठळक मुद्देपार्थसारथी मिश्रा : दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत. मुख्य निरिक्षक सर्व ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे सुक्ष्म निरिक्षक हे निरीक्षकांचे कान व डोळे असून ११ एप्रिल रोजी होणाºया मतदान प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडा, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, अभिमन्यु बोदवड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर व स्विपच्या नोडल अधिकारी कावेरी नाखले यावेळी उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात असलेल्या सहाही विधानसभा क्षेत्रातील क्रिटीकल मतदान केंद्रासाठी ४४ सुक्ष्म निरिक्षकांचे नियुक्ती करण्यात आली आहे. या सूक्ष्म निरीक्षकांना आज मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी बोलतांना डॉ. मिश्रा म्हणाले की, नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम-व्हीव्हीपॅट योग्यरीत्या काम करते किंवा नाही, मॉकपोल, मतदारांना सुविधा, दिव्यांग, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना सौजन्यपूर्ण वागणूक याबाबतचा निपक्ष अहवाल सूक्ष्म निरीक्षकांनी सादर करावयाचा आहे.
सूक्ष्म निरीक्षकांची जबाबदारी मोठी असून पारदर्शकपणे काम करणे अपेक्षित आहे. आजचे प्रशिक्षण त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मतदान संपल्यानंतर उपरोक्त बाबींचा अहवाल तात्काळ निवडणूक निरीक्षकांना सादर करण्यात यावा. या कामात दिरंगाई होता कामा नये. मतदानाच्या दिवशी काही अडचण असल्यास निवडणूक निरीक्षक किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून सल्ला घ्यावा. मात्र त्रुटीयुक्त अहवाल सादर करता कामा नये. आपण सहकार्य करण्यासाठी आलो आहो कारवाई करण्यासाठी नाही मात्र निवडणूक कार्यात दिरंगाई करणाºया व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. मिश्रा यांनी दिला.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान प्रक्रियेचे पर्यवेक्षण व निरीक्षण करण्याची जबाबदारी सुक्ष्म निरीक्षकांवर आहे. मतदानाच्या दिवशी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर घडणाºया घडामोडीचे निरीक्षण करुन सायंकाळी आपला अहवाल निवडणूक निरिक्षक यांना सादर करावा. या कामासाठी लोकसभा मतदार क्षेत्रात ४४ सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. आपण सर्वांनी प्रशिक्षण पूर्ण करुन मतदानाच्या दिवशी जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणास ४४ सूक्ष्म निरीक्षक उपस्थित होते.

Web Title: Microscopic monitoring of the polling process is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.