राज्यमार्गावर मधोमध जीवघेणा खड्डा
By Admin | Published: July 2, 2017 12:26 AM2017-07-02T00:26:08+5:302017-07-02T00:26:08+5:30
तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर माडगी शिवारातून जाणाऱ्या रस्ता खोदण्यात आला. नाली केल्यावर त्यात माती घालण्यात आली.
तुमसर-गोंदिया राज्यमार्ग : माडगी शिवारातील रस्ता ठरत आहे मृत्यूमार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर माडगी शिवारातून जाणाऱ्या रस्ता खोदण्यात आला. नाली केल्यावर त्यात माती घालण्यात आली. पावसाने ती माती ओली झाली. दररोज येथे दुचाकीस्वारांचा अपघात होत असून चारचाकी वाहनांना धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडीचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात रस्ता फोडून नालीवजा भाग निर्माण केला. हा खड्डा केवळ मातीने भरण्यात आला. उचं मातीचा ढीग येथे तयार झाला आहे. दोन दिवसापुर्वी पावसामुळे येथील माती पसरली. रात्रीला वाहनधारकांना खड्डाचा अंदाज येत नाही. अचानक समोर मातीवजा रस्ता दिसताच वाहनधारकांची तारांबळ उडते. निमंत्रण सुटत असल्याने भरधाव वाहनाने येथे अपघात होत आहे. दुचाकीस्वारांचा जीव येथे घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात रस्ता दुरूस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी दिला आहे. देव्हाी ते वैनगंगा नदीपर्यंत या रस्त्याचा दोन्ही बाजूला काळी माती आहे. पावसाळ्यात ही माती धोकादायक आहे. या मातीवर किमान मुरूम घालण्याची येथे गरज होती. दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ही सर्व कामे त्वरीत पूर्ण करण्याची मागणी जि.प. सदस्य पंचबुद्धे यांनी केली आहे.