पालांदूर येथील बाजार स्मशानभूमीच्या जागेत स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:53 AM2021-02-23T04:53:27+5:302021-02-23T04:53:27+5:30
गत दहा वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र जमीन खरेदीकरिता प्रयत्न करीत आहे. परंतु गावाशेजारची जमिनी महागडी असल्याने कृषी ...
गत दहा वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र जमीन खरेदीकरिता प्रयत्न करीत आहे. परंतु गावाशेजारची जमिनी महागडी असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती नियोजन अजूनही पूर्ण झालेले नाही. शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात वाहतूक खोळंबलेली असते. मात्र दिवसेंदिवस पशुपालन वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेळ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रभू कुरेकर, महादेव पडोळे यांच्या पुढाकारातून हा बाजार पालांदूरच्या स्मशानभूमीत मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आला.
कोट
पालांदूरचा आठवडी बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आम्ही हा बाजार स्थलांतरित केलेला आहे. स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था आम्ही करू. दर शनिवारी सुमारे आठ ते दहा हजार रुपयांचा महसूल गोळा होतो.
किशोर भैसारे,
कनिष्ठ लिपिक कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी
भविष्याच्या दृष्टीने पालांदूर हे शेळी व्यवसायात मोठी बाजारपेठ आहे. येथे व्यापार मोठ्या स्वरूपात होत आहे. दूरदृष्टीचा विचार करता व्यापाऱ्यांना हा बाजार स्मशानभूमीच्या ठिकाणी चांगला वाटत आहे.
दिगंबर दुर्गेश कोंढा /कोसरा