विविध तलावांवर स्थलांतरित पाणपक्षी गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 09:51 PM2018-03-18T21:51:58+5:302018-03-18T21:51:58+5:30

अशी पाखरे येते आणिक स्मृती सोडून जाती, दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती असे सुंदर भावगीत लिहिणाऱ्या ग.दि. माडगुळकरांच्या काव्यांची प्रचिती ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबच्या भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील मागील १८ वर्षापासून सातत्याने घेतल्या जाणाऱ्या विविध तलावांवरच्या स्थलांतरीत पाणपक्षी गणनेमध्ये यावर्षी सुद्धा प्रचिती आली.

Migratory cabbage calculations on various ponds | विविध तलावांवर स्थलांतरित पाणपक्षी गणना

विविध तलावांवर स्थलांतरित पाणपक्षी गणना

Next
ठळक मुद्देदुर्मिळ कलहंस बदक आढळले : ग्रीन फ्रेन्ड्सचा उपक्रम

आॅनलाईन लोकमत
लाखनी : अशी पाखरे येते आणिक स्मृती सोडून जाती, दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती असे सुंदर भावगीत लिहिणाऱ्या ग.दि. माडगुळकरांच्या काव्यांची प्रचिती ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबच्या भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील मागील १८ वर्षापासून सातत्याने घेतल्या जाणाऱ्या विविध तलावांवरच्या स्थलांतरीत पाणपक्षी गणनेमध्ये यावर्षी सुद्धा प्रचिती आली.
ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लबतर्फे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार कोहळी, सोमनाथ, बरडकिन्ही, रावणवाडी, कोकणागड, खुर्सीपार बांध, न्याहारवानी, गुढरी, शिवणीबांध, सिरगावबांध, चिचटोला, वलमाझरी, एकोडी, गडकुंभली, सेंदुरवाफा, साकोली, भिमलकसा, उसगाव, चांदोरी, पिंपळगाव, लाखनी, भूगाव मेंढा तसेच गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, कोहलगाव, सौंदड, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, बोदलकसा, चोरखमारा, जांभळी, येनोडी, बोंडगाव , सुरबन, इटियाडोह, भिवखिडकी, मुगली तलावावर स्थलांतरीत पक्षीगणना करण्यात आली. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने स्थलांतरीत बदके जी सैबेरिया, मंगोलिया, लडाख, काश्मिर, चीन, युरोप, अफगाणिस्तान, इराक, इराण भागातून आलेली ही बदके आता परतीच्या मार्गाच्या वाटेवर लागली आहेत. त्यांच्या निरीक्षणामध्ये यावेळी दुष्काळामुळे तलावात पाणी कमी असल्याने काही चांगल्या तलावावर पक्ष्यांनी पाठ फिरविली तर काही जंगल तलावात व गाव तलावामध्ये पाण्याचा पुरेपुर साठा असल्याने तिथे भरपूर पाणपक्षी आढळले. थंडीचे प्रमाण डिसेंबर शेवट व जानेवारी महिन्यात टिकून राहिल्याने पाणपक्ष्यांची विविधता फेब्रुवारी पर्यंत टिकून राहिली असे सुद्धा प्रा.गायधने यांनी सांगितले.
यावर्षी दुर्मिळ कलहंस बदक भरपूर प्रमाणात काही तलावावर दिसली असली तरी मागील तीन वर्षापासून दिसणारे राजहंस बदकांनी यावर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यात पाठ फिरविली असे त्यांना निरीक्षणात आढळले. पाणबदकामध्ये मोठा स्वरल, चक्रवाक, नकटा गडवाल, तरंग, प्लवा, अटला, चक्रांग, भुवई, तलवार, मोठी लालसरी, शेंडीबदक, कलहंस, बदक, जांभळी, पाणकोंबडी, विविध पाणतलाव , तुरवार, मालगुजा, कमळपक्षी, सोनपुंखी, कमळपक्षी, शेकाट्या, रंगीत, करकोचा, चिलखा, टिटवी, पाणकावळे, चांदीबदक, तिरंदाज, उघडचोच, करकोचा, काळा व पांढरा शराटी, युरिेशिनय चमचाचोच, करकोचा, खंड्या, कबड्या ढिवर, छोटा खंड्या, तसेच विविध प्रकारचे बगडे, व ढोकरी इत्यादी स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्षी आढळले. स्थलांतरीत पाणपक्षी गणनेचा अहवाल बी.एन.एच.एस. मुंबई व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडे पाठविण्यात आला. हिवाळी पाणपक्षी गणनेला ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी ओशक वैद्य, दिलीप भैसारे, दिनकर कालेजवार, आकाश कोडापे व रतन कोडापे, रामपुरी यांनी सहकार्य केले.

Web Title: Migratory cabbage calculations on various ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.