चाऱ्याअभावी पशुपालकांचे स्थलांतरण
By Admin | Published: March 31, 2017 12:31 AM2017-03-31T00:31:28+5:302017-03-31T00:31:28+5:30
तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या व जैवविविधतेचा कोषागार अशी ओळख
चारा व पाणीटंचाई कायम : आलेसूर परिसरात विहीरींनीही गाठला तळ
आलेसूर (तुमसर) : तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या व जैवविविधतेचा कोषागार अशी ओळख असलेल्या दक्षिण-उत्तर भागात चारा व पाणी टंचाईमुळे शेकडो पशुपालक पशुधना समवेत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण करीत आहेत.
यात सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अधिकांश पशुपालक बिऱ्हाडासमवेत महाराष्ट्रात दाखल होत आहेत. अलिकडे मागील सत्रात लेंडेझरी, नाकाडोंगरी, जांब कांद्री, वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार, सीसीटी सलग समतल चर, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, कृषी विभागा अंतर्गत मोठ्या प्रमाणात मृद व जलसंधारणाची कामे करण्यात आली. मात्र साठवण तलाव, वन तलाव, मामा तलाव खाजगी मालगुजारी तलाव यात ओंजळभर जल शिल्लक राहिले नाही तसेच कित्येक शासकीय व खाजगी विहरी शुल्क भग्नाअवस्थेत पाहावयास मिळत आहेत. परिणामी परिसरात कमाल प्रमाणात भुर्गभाची जलस्त्रोत पातळी अधिक खोलवर गेली आहे.
(वार्ताहर)