दुधात भेसळ करुन केली जाते शहरात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:08 PM2018-10-05T22:08:43+5:302018-10-05T22:09:27+5:30

तुमसर तालुक्यात मध्यप्रदेशातील दूध येत आहे. त्यात भेसळ केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दुधात युरिया, ग्लुकोज, कास्टीक सोडा व गोडेतेलापासून तर पाण्यापर्यंत भेसळ करुन मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मध्यप्रदेशातील दूधाचा यात समावेश असून दुध घट्ट दिसण्याकरिता लॅक्टोस मिसळविले जात आहे.

Milk is sold by adulterated in the city | दुधात भेसळ करुन केली जाते शहरात विक्री

दुधात भेसळ करुन केली जाते शहरात विक्री

Next
ठळक मुद्देमध्यप्रदेशातील दूध महाराष्ट्रात : अन्न, प्रशासन विभागाचे दुर्लक्ष

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यात मध्यप्रदेशातील दूध येत आहे. त्यात भेसळ केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दुधात युरिया, ग्लुकोज, कास्टीक सोडा व गोडेतेलापासून तर पाण्यापर्यंत भेसळ करुन मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मध्यप्रदेशातील दूधाचा यात समावेश असून दुध घट्ट दिसण्याकरिता लॅक्टोस मिसळविले जात आहे. विषारी दुधामुळे रोगराईला आमंत्रण मिळण्याची शक्यता अधिक आहे. हा गोरखधंदा रोखण्याकरिता अन्न व प्रशासन विभाग हतबल ठरले आहे. आंतरराज्यीय दुध वाहतूक करण्याचा नियम आहे काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
धवलक्रांतीकरीता नगरी व्यवसाय म्हणून दूध क्षेत्राकडे रोजगाराचे सशक्य माध्यम म्हणून पाहिले जाते. दूधाचे प्रचंड उत्पादन होत असल्याचा कांगावा केला जात आहे, परंतु हा दुध कुठून येतो याचा तपास अद्याप कोणत्याच यंत्रणेने केली नाही. तुमसर तालुका मध्यप्रदेशाला लागून आहे. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात दुध तुमसर तालुक्यात येतो. येथे त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तो दुध इतर शहर व नागपूरात पाठविला जातो. स्थानिक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत. त्यांच्याकडेही दुध होतो, परंतु दुध शुध्द आहे काय? याचा पुरावा नाही.
दुधात सर्रास पाणी घातले जाते. तो पाणी शुध्द नाही त्यामुळेही काविळ व अतिसार सारखे आजार लहान मुलांना होत आहेत. दुधात लॅक्टोज मिसळविले जात आहे. त्यामुळे दुध घट्ट येते. घट्ट दूध शुध्द मानला जातो. लॅक्टोजचेही मोठे दुष्परिणाम होतात. दुधात युरिया, ग्लुकोज, कास्टीक सोडा व गोडेतेल मिसळविले जात आहे. यामुळे किडनी, यकृत, आतड्यांवर विपरीत परिणाम होतो. दूध तपासणारी यंत्रणा केवळ कागदावर आहे. सर्वसामान्यांना दुधाच्या शुध्दतेबाबत केवळ शंका उपस्थित करता येते. त्याचा शोध लावता येत नाही. सिंगाड्याच्या पावडर ही दुधात घातले जात असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातून येणाºया दुधाची तपासणी ही संशोधनाचा विषय आहे.
दुधात भेसळ रोखण्यात अन्न व औषध प्रशासन विभाग हतबल ठरला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दुधभेसळीने गंभीर स्वरुप धारण केल्याचे चित्र सध्या आहे. तुमसर तालुक्यात अद्याप दूध भेसळ प्रकरणाची ठोस कारवाई अद्याप झाली नाही. भेसळ ओळखण्याकरिता नागपूरात सुसज्ज प्रयोगशाळा आहे, परंतु त्या प्रयोगशाळेत कुठले दुध जाते हा मुख्य प्रश्न आहे. सध्या पूर्व विदर्भात अन्न व प्रशासन विभागाचे एक पथक शोध मोहिमेवर आहे. पांढºया दुधाच्या धंद्यात कुणाचे हात काळे आहेत याचा किमान शोध लावण्याची गरज आहे. तपास व चौकशीचा फार्स केवळ कागदोपत्री राहता कामा नये. हॉटेलात उपयोगात येणाऱ्या दुधाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
दुध भेसळीसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे, पंरतु किमान सहा महिन्याची शिक्षा सुध्दा तालुक्यात कुणाला झाली नाही. नागपूरात दुध पुरवठा करणारा तुमसर हा प्रमुख तालुका आहे हे विशेष.

दूध भेसळीचे अनेक दुष्पपरिणाम आहेत. भेसळीचे दुध पोटात जाऊन विशेषत: लहान मुलांना गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक आहे. लहान मुले दुध पिण्यास नाकारत असतील तर निश्चितच ते दूध भेसळीचे असण्याची शक्यता अधिक आहे. दुध प्यायल्यानंतर मूलाने पोट दुखल्याची तक्रार केल्यास दुध भेसळीचे शंका अधिक आहे. शासनाने तपासणी नियमित करण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. पंकज कारेमोरे
युवक काँग्रेस नेते तुमसर

Web Title: Milk is sold by adulterated in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.