१ जानेवारी २००० ला जन्मलेले होणार मिलेनियम व्होटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:57 PM2017-11-18T23:57:25+5:302017-11-18T23:57:52+5:30
निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु केला असून २१ व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २००० रोजी जन्म झालेल्या मुला मुलींना १ जानेवारी २०१८ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण होत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु केला असून २१ व्या शतकाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी २००० रोजी जन्म झालेल्या मुला मुलींना १ जानेवारी २०१८ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण होत आहे. अशा सहस्त्रक मतदारांचा शो१ जानेवारी २००० ला जन्मलेले होणार मिलेनियम व्होटर्स
ध घेऊन त्यांची जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीत नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मतदारांना मिलेनियम व्होटर्स म्हणून विशेष मतदार स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक शाळेत निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करावा, अशा सूचना उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे यांनी दिल्या.
जिल्हयातील मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व शिक्षणाधिकारी बी.एल. थोरात उपस्थित होते.
भारतामध्ये दर दिवशी ७४ हजार मुलांचा जन्म होतो. राज्यात हा आकडा २ हजार तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये १०० असा आहे. १ जानेवारी २००० रोजी प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० मुलांचा जन्म झाला असावा असा अंदाज धरुन प्रत्येक जिल्ह्यात १०० मिलेनियम व्होटर्सची नोंद व्हावी, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केल्याचे विजय उरकुडे यांनी सांगितले. जे युवक युवती मिलेनियम व्होटर्स म्हणून नोंदणी करतील अशा मतदारांच्या घरी जावून बिएलओ यांनी सत्कार करावा तसेच राष्ट्रीय मतदार दिवस २०१८ रोजी तरुण मतदारांच्या समवेत त्यांना मी भारताचा मिलेनियम व्होटर्स आहे, असे खास बॅच देवून सत्कार करण्यात यावा. अशी आयोगाची अपेक्षा आहे. यादृष्टीने मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्या शाळा महाविद्यालयातील मिलेनियम व्होटर्सची माहिती गोळा करावी, असे ते म्हणाले.
शाळेतील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया काय आहे, मतदान कसे होते तसेच मतदानासंबंधी जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याच्या सूचना आहेत. शाळेने या क्लब मध्ये एक नोडल अधिकारी नेमावा. या क्लबला जिल्हास्तरावरील मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात येईल. निवडणूक साक्षरता क्लबचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात पहिल्या ३० शिक्षण संस्थांची निवड केली जाणार आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मतदार म्हणून प्राधान्याने नोंदणी करावी.
त्यासाठी कॉलेज अॅम्बेसिडर व स्टुडंट अॅम्बेसिडर यांनी नियुक्ती करुन त्यांची यादी तहसिलदारांना सोपवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्याच प्रमाणे चुनाव पाठशाला व व्होटर्स अवेरनेस फोरम शाळा महाविद्यालयात स्थापन करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. मतदार नोंदणी विशेष मोहिमेला ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याचे त्यांनी सांगितले.