उत्तम कामगिरीसाठी मन प्रफुल्लीत असणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:30 PM2018-06-10T22:30:45+5:302018-06-10T22:30:57+5:30

घरातील वातावरण आल्हाददायक, मनाला प्रफुल्लीत करणारे असेल तर कर्तव्यसुद्धा तेवढेच आनंदाने व जोमाने पार पाडू शकतो. मात्र घरचे वातावरणच जर त्रासदायक असेल तर काम करताना साहजीकच चिडचिड निर्माण होवून कर्तव्य निटपणे पार पाडू शकणार नाही. मोहाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा पुढील भाग फारच जिर्ण झालेला होता तिथे काम करताना त्रास व्हायचा, आता मात्र त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आल्याने तेथे बसून काम करणाऱ्या पोलिसांचेही मन प्रफुल्लीत होवून ते आपले कर्तव्य चोखपणे बजावतील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.

The mind needs to be full of good performance | उत्तम कामगिरीसाठी मन प्रफुल्लीत असणे गरजेचे

उत्तम कामगिरीसाठी मन प्रफुल्लीत असणे गरजेचे

Next
ठळक मुद्देविनिता साहू : मोहाडी पोलीस ठाण्याचे सौंदर्यीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : घरातील वातावरण आल्हाददायक, मनाला प्रफुल्लीत करणारे असेल तर कर्तव्यसुद्धा तेवढेच आनंदाने व जोमाने पार पाडू शकतो. मात्र घरचे वातावरणच जर त्रासदायक असेल तर काम करताना साहजीकच चिडचिड निर्माण होवून कर्तव्य निटपणे पार पाडू शकणार नाही. मोहाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा पुढील भाग फारच जिर्ण झालेला होता तिथे काम करताना त्रास व्हायचा, आता मात्र त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आल्याने तेथे बसून काम करणाऱ्या पोलिसांचेही मन प्रफुल्लीत होवून ते आपले कर्तव्य चोखपणे बजावतील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.
मोहाडी पोलीस ठाण्याच्या समोरील पडविचे व ठाणेदार कक्षाच्या विस्तारित वास्तुच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुधाकर चव्हाण, प्रभारी ठाणेदार ढोबळे उपस्थित होते.
मोहाडी पोलीस ठाण्याची दयनिय अवस्था होती. या पोलीस ठाण्याची स्थापना १९४८ ला झाली त्यामुळे ही इमारत जवळपास ७० वर्षी जुनी आहे. कौलारु छत असल्याने व लाकडी फाटे सडल्याने पावसाळ्यात पाणी गळत होते. उन्हाळ्यात उष्णलाटा आत यायच्या, ज्यामुळे अंमलदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मोहाडी येथे रूजू झाल्यावर ठाणेदार सुधाकर चव्हाण यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी लोकसहभागातून परिस्थिती सुधारण्याचा विडा उचलला. यासाठी पोलीस अधिखक विनीता साहू व एसडीपीओ संजय जोगदंड यांच्या परवानगीने तालुक्यातील सामाजिक व्यक्ती व दानशुर व्यक्ती यांची भेट घेवून समस्या मांडल्या. अजय साकुरे यांनी छताखाली टिन दिले, जलील रिझवी यांनी बांधकामाचे संपूर्ण सिमेंट व लेबर खर्च दिला. बेटाळा ग्रामपंचायतचे सरपंच रामसिंग बैस यांनी टाईल्स दिल्या, सुरेश ठवकर यांनी छतासाठी प्लायवूड दिले. सचिन गायधने यांनी संपूर्ण नवीन बांधकामाची रंगरंगोटी करून दिली. विटा व्यवसायीक सचिन राखडे यांनी विटा दिल्या. या लोकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून केलेल्या सहकार्याच्या जोरावर पोलीस ठाण्याचे सौंदर्यीकरण झाले. ज्यामुळे मोहाडी पोलीस ठाणे नववधू सारखे सुंदर झाले आहे. या कार्यक्रमात दानदात्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांची उत्कृष्ठ भूमिका मांडणारे पत्रकार सिराज शेख, यशवंत थोटे यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पोलीस विभागाचे राऊत, वाकलकर, वाघमोडे, चांदेवार, सेलोकर, आस्वले, केवट, पिकलमुंडे, शरणागत, हाके, शेंडे, निकोसे, तिवाडे, वरकडे, शेंडे, मेश्राम, रोडगे, भुरे, चोरमोर, भांडे, गिºहेपुंजे, कासदा, गोमासे, बडगे, बांते, ठवकर, अगाशे वालदे आदी उपस्थित होते. संचालन राहुल डोंगरे यांनी तर प्रस्तावना ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी मानले.

Web Title: The mind needs to be full of good performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.