मनात वाणीची प्रतिष्ठा असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:42+5:30

जवाहरनगर पेट्रोलपंप येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात युजीसी दिल्ली पुरस्कृत महात्मा गांधीचे अभ्यास केंद्राद्वारे गांधी विचारधारा आणि ग्रामस्वराजची संकल्पना या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू बोलत होते.

The mind should have the reputation of speech | मनात वाणीची प्रतिष्ठा असावी

मनात वाणीची प्रतिष्ठा असावी

Next
ठळक मुद्देसिद्धार्थ काणे : ठाणा येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : मानवी मन विचलीत असतो. त्याला स्थिर राहण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचाराची आवश्यकता आहे. आपण महात्मा गांधीन बघितले नाही, पण त्यांचे विचार आत्मसात करून दैनंदिन जीवनात वापर केल्यास महात्मा गांधींना पाहल्यासारखे वाटेल. असत्य भाषाने कार्य करू नका. यासाठी जे मनात विचार आहे, त्या मनात वाणीची प्रतिष्ठा असावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी केले.
जवाहरनगर पेट्रोलपंप येथील कला व वाणिज्य पदवी महाविद्यालयात युजीसी दिल्ली पुरस्कृत महात्मा गांधीचे अभ्यास केंद्राद्वारे गांधी विचारधारा आणि ग्रामस्वराजची संकल्पना या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव तथा रातुम नागपूर विद्यापीठाचे विद्वत परिषदेचे माजी सचिव डॉ. जी.डी. टेंभरे, मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्थान व टेलीव्हिजन प्रवक्ता डॉ. अंचराज संध्या देवी, नेपालचे प्रख्यात कवि व साहित्यकार राजेंद्र गुरागाई, संस्था अध्यक्ष युगकांता रहांगडाले, प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी उपस्थित होते.
डॉ. अंचराज संध्यादेवी म्हणाले, महात्मा गांधी व्यासपिठाच्या माध्यमातून गांधीजीचे विचार घेवून चांगले सुसंस्कार घडवा. आजघडीला महात्मा गांधीचे विचार सर्वांना प्रेरणादायी ठरते. मॉरिशसला गांधीजींच्या अहिसांचे विचाराने प्रेरित होऊन माणूस जोडण्याची कामे झाली. मॉरिशसला आंतरिक स्वातंत्र्य निर्मितीस हातभार लागला. गुरागाई म्हणाले की, नेपालची जनता महात्मा शांतीचे विचार अगोदरच शांतीदूत बुद्धाच्या रूपात प्राप्त झाले आहेत. यात गांधीजींच्या विचाराची भर पडली आहे. आम्ही पूर्णपणे महात्मा गांधी बनू शकत नाही, पण त्यांचे विचार जनमाणसात रूजवून माणुसकी निर्माण करू शकतो. जन्माने कुणी महात्मा बनत नाही तर त्यांच्या प्रगट कर्तृत्ववानाने बनतो. त्यातलेच महात्मा गांधी होत.
सातासमुद्रापलीकडील माणसं जोडण्याचे विचार महात्मा गांधीच्या विचारात आहे. डॉ. जी.डी. टेंभरे म्हणाले की, परमाणू शस्त्रापेक्षा अहिंसारूपी महात्मा गांधी यांचे वैचारिक विचाराचे शस्त्राचा वापर केल्यास शांती, सद्भाव नांदेल यात दुमत नाही. या व्यासपीठाच्या माध्यमातून महात्मा गांधीचे विचार प्राध्यापक वर्गानी विद्यार्थ्यांमध्ये रूजवावे हिच खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्वानिमित्त सार्थक ठरेल, असेही ते म्हणाले.
दुपारच्या पहिल्या सत्रात फतेहाबाद येथील हिंदी विद्यालय शिक्षण विभागाचे प्रवक्ता डॉ. सत्यनारायण यांच्या अध्यक्षतेखाली मनोज पांडे यांनी ‘गांधी विचार आणि ग्राम स्वराज्य’ या विषयावर शोध निबंधाचे वाचन केले. तत्पूर्वी विविध ठिकाणाहून आॅनलाईन शोध निबंधाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी तर आभार डॉ. राजेंद्रप्रसाद पटले यांनी मानले.

Web Title: The mind should have the reputation of speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.