तुमसर तालुक्यातील मायनिंग क्लस्टर प्रकल्प धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:43+5:302021-01-08T05:55:43+5:30
तुमसर तालुक्यात चिखला व डोंगरी बुज येथे मॅग्निज खाणी आहेत. मॅग्निज निगडित उद्योग प्रकल्प उभारले जावे आणि बेरोजगारांना ...
तुमसर तालुक्यात चिखला व डोंगरी बुज येथे मॅग्निज खाणी आहेत. मॅग्निज निगडित उद्योग प्रकल्प उभारले जावे आणि बेरोजगारांना रोजगार मिळवा यासाठी महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशनतर्फे मायनिंग क्लस्टरचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला. त्यासाठी तालुक्यातील गोबरवाही नजीकच्या येदरबूची येथील ३५ एकर महसूल विभागाची जागा निश्चित करण्यात आली. ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आदी सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. मात्र, प्रस्तावावर अद्याप कोणतेही काम सुरू करण्यात आले नाही. परिणामी मायनिंग क्लस्टरच्या प्रस्तावाला कार्यान्वित करून प्रकल्पाला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक विशेष सभा आयोजित करावी अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे,काँग्रेस नेते रमेश पारधी, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, एनएसयुआयचे शुभम गभने, प्रमोद कटरे, अरविंद ठाकरे, गिरधारी दमाहे आदी उपस्थित होते.