येदरबुची येथील मायनिंग क्लस्टर रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:07 AM2021-02-21T05:07:04+5:302021-02-21T05:07:04+5:30
तुमसर : तालुक्यात आत्मनिर्भर भारतकरिता अनेक संधी उपलब्ध आहेत. येथे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाने महसूल प्रशासनाकडे ३० एकर ...
तुमसर : तालुक्यात आत्मनिर्भर भारतकरिता अनेक संधी उपलब्ध आहेत. येथे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाने महसूल प्रशासनाकडे ३० एकर जागेची मागणी केली होती. सदर जमिनीची किंमत जास्त असल्याने खनिकर्म महामंडळाने ती घेण्यास नकार दिला. त्यामुळे महत्त्वपूर्ण मॅग्निज क्लस्टर प्रकल्प रखडला आहे.
दोन वर्षांपूर्वी येदरबुची येथे महाराष्ट्र खनिकर्म महामंडळ नागपूरतर्फे मायनिंग क्लस्टरसाठी महसूल विभागाला ३० एकर जागेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी केली होती. परंतु जमिनीची किंमत मोठी आकारण्यात आली. त्यामुळे खनिकर्म महामंडळाने ती घेण्यास नकार दिला. त्यामुळे महत्त्वपूर्ण असा मायनिंग प्लॅस्टरचे काम रखडले आहे. शासकीय जमिनीची किंमत अतिशय जास्त असल्याने खनिकर्म महामंडळाने ती किंमत देण्यास नकार दिला.
तुमसर तालुक्यात मोठा मॅग्निजचा साठा परिसरात आहे. तसेच जगप्रसिद्ध मॅग्निज खाणी आहेत. खनिज आधारित उद्योग येथे सुरू करता येते. कमी किमतीची जागा महसूल प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास मायनिंग क्लस्टर येथे उभारण्यात येऊ शकतो. सदर तालुक्यात झुडपी जंगलामुळे विकासाला खीळ बसली आहे. मायनी क्लस्टर तयार झाल्यास स्थानिक रोजगारांना येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. परिसरात दुसरे उद्योगधंदे नाहीत. मॅग्निजवर आधारित उद्योगधंद्याची स्थापना येथे होऊ शकते. इतर राज्यात खाण परिसरात मोठे मायनिंग क्लस्टर तयार करण्यात आलेले आहेत.
तुमसर तालुक्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येदरबुची परिसरात मायनिंग क्लस्टर तयार करण्यात आल्यास स्थानिक आदिवासी बांधवांना येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. आमदार राजू कारेमोरे व खासदार सुनील मेंढे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.