अल्पवयीन मुलाला महिलेकडून मारहाण

By admin | Published: October 2, 2016 12:29 AM2016-10-02T00:29:05+5:302016-10-02T00:29:05+5:30

एका अल्पवयीन मुलाने अश्लिल शिवीगाळ केली म्हणून त्या मुलाला जबर मारहाण केल्याची तक्रार ..

Minor child beating woman | अल्पवयीन मुलाला महिलेकडून मारहाण

अल्पवयीन मुलाला महिलेकडून मारहाण

Next

बाळापूर येथील घटना : गुप्तांगाला केले जखमी, गावात भीतीचे वातावरण
तुमसर : एका अल्पवयीन मुलाने अश्लिल शिवीगाळ केली म्हणून त्या मुलाला जबर मारहाण केल्याची तक्रार मुलासह त्याच्या पालकांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात नोंदविली. या प्रकरणी एकमेकाच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. हा प्रकार तुमसर तालुक्यातील बाळापूर मॉईल वसाहतीत घडला.
कुशाल चौधरी (१७) रा.बाळापूर हा दोन मित्रांसोबत घराजवळच्या चौकात उभा होता. चौकाशेजारी एका महिलेचे घर आहे. कुशलने अश्लिल शब्दात शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर महिला कुशालच्या अंगावर धावून आली. तिने कुशालला मारहाण केली. कुशालने तिथेच आरडाओरड केली. त्याच्या दोन्ही मित्रानी हा प्रकार कुशालच्या घरी सांगितला. प्रकृती बिघडल्याने त्याला गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या प्रकारामुळे कुशाल चौधरी व त्याचे कुटूंबीय घाबरुन गेले त्यांनी बाळापूर येथील तंटामुक्त समितीकडे हे प्रकरण दाखल केले. सदर महिलेने अश्लिल शिवीगाळ प्रकरणाची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात केली. कुशालने दुसऱ्या दिवशी या महिलेची गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी महिलेविरुध्द भांदवि २९४, ३२३, ५०६, ३४ तर कुशाल विरोधात भादंवि २९४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शुक्रवारी तुमसर येथे कुशाल चौधरी, त्याचे पालकांनी पत्रपरिषद घेऊन संबंधित महिलेविरूद्ध गुन्हा नोदंविण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी अन्यायग्रस्तानी तुमसर येथे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुलावर लावण्यात आलेले आरोप मागे घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला हेमंत चौधरी, दिनेश ठिमरीया, मनिष मलघाटी, राजू गायकवाड, तुकाराम चौधरी, तपेश लिमजा, प्रियंका बुराडे, विनोद बुराडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Minor child beating woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.