जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:27 PM2018-05-13T22:27:17+5:302018-05-13T22:27:17+5:30

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे.

The Mirage of the Water Ship | जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

Next
ठळक मुद्देकरडी परिसरात जलसंकट : सर्वांच्या पुढाकाराची गरज, वृक्ष संवर्धन व संगोपन मोलाचे

युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४ गावात ही योजना राबविण्यात आली. पुढील वर्षात तालुक्यातील २० गावे या योजनेत समाविष्ट आहेत. पंरतु, सध्यातरी योजना शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादीत असून डबके ठरु पाहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने योजना लोकाभिमुख होण्यासाठी व सर्वांना लाभ मिळण्यासाठी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.
करडी परिसरातील दुष्काळी कोरडवाहू भागात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. लोकसहभागाचा येथे नामोनिशान नाही. लोकांची उदासिनता यासाठी कारणीभूत ठरतांना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून परिसराला सतत दुष्काळाचे चटके बसत आहेत. मागील ४ वर्षांपासूनची नापिकी व भविष्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव होण्यासाठी प्रचार व प्रसाराबरोबर जाणीवजागृतीची व मानसिकता बदलविण्याची गरज आहे.
वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमानाचा फटका करडी परिसरताील कृषी क्षेत्रावर अधिकच जाणवत आहे. मागील तीन वर्षापासून दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागत आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर न आलेल्या पावसामुळे पडीत राहत आहे. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च त्यामुळे वाया जात आहे. नैराश्यातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी वृक्ष लागवउीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.
शासन अनेक वर्षांपासून जलसंधारणाचे काम करत आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळेच ही जलयुक्त शिवार योजना लोकचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थाच्या श्रमदानातून जलसंधारणाची, नदी-नाले तलाव खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. ज्या गावातील ग्रामस्थ पाणी व सिंचन प्रश्नावर एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहरा बदलून गेला आहे. या सर्व बाबींचा आदर्श डोळ्यासमोर घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये विविध सामाजिक संस्था व संघटनाबरोबर लोकसहभागातून ओढे, नाले, तलाव यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दा पातळीवर सुरु आहेत. यामुळे भविष्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्यास मोलाची मदत होणार आहे. जलयुक्त शिवार चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसला जाईल. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, बोरवेल्स खोदण्यात कायमची बंदी येईल व त्याचा फायदा निश्चितच शेतशिवाराला व पिकांना होईल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहिदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार आहे. गरज आहे तिला लोकाभीमुख करण्याची. तसे झाल्यास श्रमदानातून गावे पाणीदार होतील. दुष्काळाची चिंता मिटेल. जलयुक्त शिवार लोकचळवळी बरोबर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.

Web Title: The Mirage of the Water Ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.