तेंदुुपत्ता कामगारांच्या बोनस वाटपात गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:12 AM2019-08-15T01:12:35+5:302019-08-15T01:13:07+5:30
तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील गर्रा बघेडा विभागा अंंतर्गत येत असलेल्या तेंदुुपत्ता कामगारांना वाटप करण्यात आलेल्या बोनस वाटपात घोळ करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून गरीब जनतेवर अन्याय केला गेला आहे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयाला ५ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकणार असल्याचा इशारा तहसीलदाराना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे
शिवसेना तुमसर तालुका च्या वतीने तेदूंपत्ता कामगार गर्रा बघेडा विभाग द्वारा सन २०१७ चे बोनस वाटप मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल व अन्यायग्रस्त गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता मागीलवर्षी १४ आॅगष्ट २०१८ ला गर्रा बघेडा वन विभाग कार्यलयाला ताला ठोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महसूल अधिकारी व वन प्रशासकीय अधिकारी यांनी तीन महीन्याच्या आंत सर्व योग्य लाभार्थी गरीब तेदूंपत्ता कामगारांच्या बँक खात्यात बोनस ची रक्कम आम्ही जमा करून देऊ , परंतु एक वर्ष लोटला तरी योग्य लाभार्थी च्या खात्यात पैसे जमा झाले नाही उलट जे बोगस लाभार्थी होते त्यांच्या खात्यात कांही भ्रष्ट व संगतमत अधिकारी नी पैसे जमा केले व एकदा पुन्हा योग्य गरीब मजदूर कामगारांना डावलले गेले आहे परंतु आता ही बाब शिवसेना खपवून घेणार नाही तर जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात २७ आॅगष्ट २०१९ पर्यत जर बोनसचे पैसे जमा झाले नाही, तर शिवसेना तुमसर तालुकाच्या वतीने ५ नोव्हेंबर २०१९ ला गर्रा बघेडा वन विभाग कार्यालयाला ताला ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे व यात शिवसैनिकांकडून कोणत्याही प्रकारची तीव्र हानी झाल्यास प्रशासन व प्रशासकीय अधिकारी जवाबदारी राहणार असे निवेदनातून इशारा देण्यात आला.
निवेदन देते वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश उचिबगले, सुधाकर कारेमोरे, माजी पंचायत समिति उप-सभापति शेखर कोतपल्लीवार, अनिल दुरुगकर, पंचायत समिति सदस्य जितेंद्र सरयाम, भा. वि. सेना तुमसर हेमंत रहांगडाले, विधानसभा प्रमुख प्रकाश पारधी, तालुका प्रमुख प्रकाश लसुंते, शिवसेना शहर प्रमुख नितिन शेलोकर, उपतालुका प्रमुख शिवा शेंदरे, भा. वि. सेना उपतालुका संघटक इंजि. कैलाश राहांगडाले, माजी वाहतूक सेना संघटक दीनेश पांडे , उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, उपतालुका प्रमुख विजय राणे, भा. वि. सेना तालुका संघटक राखीचंद राहांगडाले, उपतालुका प्रमुख शैलेश मिश्रा,संपत बागळे, कीशोर यादव फकीरचंद राऊत, चंदन राऊत, संजय उके, रमेश नेवारे, धर्मराज राऊत, दशरथ बागडे, गुड्डू डहरवाल आदी शिवसैनिक उपस्थित होते.