शासकीय वाहनांचा गैरवापर

By Admin | Published: November 29, 2015 01:38 AM2015-11-29T01:38:56+5:302015-11-29T01:38:56+5:30

शासकीय कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु तसे न करता तुमसर तालुक्यातील अधिकारी राज्याच्या उपराजधानीतून

Misuse of government vehicles | शासकीय वाहनांचा गैरवापर

शासकीय वाहनांचा गैरवापर

googlenewsNext

इंधनावर शासनाचा होतो खर्च : जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईची करण्याची गरज
तुमसर : शासकीय कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु तसे न करता तुमसर तालुक्यातील अधिकारी राज्याच्या उपराजधानीतून ये-जा करीत असून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर त्यांना नेऊन सोडणे व आणणे याकरिता सर्रास शासकीय चारचाकी वाहनांचा उपयोग केला जात आहे. यामुळे शासनाला लाखो रूपये दरवर्षी इंधनावर निश्चितच खर्च करावा लागत आहे.
तुमसर शहर तालुक्याचे स्थळ आहे. येथे प्रत्येक विभागाचे तालुकास्थळी मुख्यालय आहे. मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागपूर येथून दररोज ये-जा करतात. तुमसर रोड येथे पाच कि़मी. अंतरावर रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर मेल, एक्सप्रेस गाड्या थांबतात. शासकीय कार्यालयात वेळेत त्यांचे अपडाऊन होत आहे. नागपूर येथून तुमसर तालुकास्थळी किमान दररोज ८० ते ९० अधिकारी, कर्मचारी ये-जा करीत आहेत, आपल्या ये-जा करीता नियमबाह्यपणे शासकीय चारचाकी वाहनांचा सर्रास वापर करणे मात्र सुरू आहे.
एकीकडे मुख्यालयी न राहणे नियमबाह्य आहे. तर दुसरीकडे ये-जा करण्याकरिता शासकीय वाहनांचा सर्रास वापर करणे हा शासकीय नियमांचा भंग करणे होय. यात शासकीय रुग्णालय तहसील कार्यालय, बँक, पंचायत समिती, कृषी विभाग, वीज विभागांचा समावेश आहे.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर सकाळी व सायंकाळी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नित्यनियमाने दर्श होते. यात शासकीय वाहने त्यांच्या दिमतीला असतात सकाळी व दुपारी विदर्भ एक्सप्रेसच्या वेळीही वाहने येथे सर्रास उभी राहतात. कार्यालयीन कामे तथा साईटवर जाण्याकरिता त्यांचा उपयोग कमी व खाजगी कामाकरिताच वाहनांचा उपयोग केला जात आहे.
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यालयी राहणे हा नियम येथे पायदळी तुडविल्या जात आहे. तुमसर येथून भंडारा या जिल्हास्थळावरही अनेक कर्मचारी दुचाकी व बसने दररोज प्रवास करतात. तालुका मुख्यालयी अनेक शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, लिपीक ये-जा करतात. येथे नियम हा कागदोपत्री दिसत आहे. अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचाऱ्यांना सुद्धा येथे मुभा मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या अपडाऊनमुळे अनेक नागरिकांना कार्यालयात कामासाठी आले असता ते जागेवर मिळत नसल्याने आल्यापावली परतावे लागते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Misuse of government vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.