चिखला खाणीत कामगाराचा मृत्यू

By Admin | Published: January 21, 2017 12:29 AM2017-01-21T00:29:05+5:302017-01-21T00:29:05+5:30

सिमेंट पाईप दुरुस्ती करताना एका कंत्राटी कामगाराचा तोल गेल्याने तो ३० फुट खाली दगडावर कोसळला.

Mitchwork worker's death | चिखला खाणीत कामगाराचा मृत्यू

चिखला खाणीत कामगाराचा मृत्यू

googlenewsNext

३० फूट खाली कोसळला : कामगारांमध्ये संताप
तुमसर : सिमेंट पाईप दुरुस्ती करताना एका कंत्राटी कामगाराचा तोल गेल्याने तो ३० फुट खाली दगडावर कोसळला. तुमसर येथे उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता आणताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत शुक्रवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास घडला.
दिलीप तुकाराम सोनवाने (३६) रा. चिखला असे मृत अकुशल कामगाराचे नाव आहे. अंबिका मायनिंग प्रगती प्रा.लि. धनबाद कंपनीचा कंत्राटी कामगारांचे १० ते १२ जणांचे एक पथक सकाळी ७.३० वाजता खाणीत गेले. सिमेंट पाईप चोक झाल्याने तो दुरुस्ती करण्याकरिता दिलीप सोनवाने वर चढला. पाईप दुरुस्ती दरम्यान दिलीप सोनवाने यांचा तोल गेला. तो खाली पडला. रक्तबंबाळ झालेल्या दिलीपला इतर कामगारांनी खाणी बाहेर काढले. प्रथम दिलीपला स्थानिक मॉईल प्रशासनाच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नंतर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी दरम्यान त्याला मृत घोषित केले. शुक्रवारी माईनला सुटी राहते. पंरतु दुरुस्ती कामे करण्याकरिता १० ते १२ जणांना शुक्रवारी कामावर बोलाविण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)

चिखला भूमीगत खाणीत प्रत्येक कामगार सुरक्षा उपकरणांचा उपयोग करतात. दिलीप सोनवाने यानेही सुरक्षा साधनांचा उपयोग केला होता. खाण प्रशासनाच्या नियमानुसार मृतकाच्या कुटूंबाला आर्थिक मदत देण्यात येईल.
- आनंदकुमार चौकसे,
खाण व्यवस्थापक, चिखला

Web Title: Mitchwork worker's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.