अखेर आमदार कारेमोरे नमले... माता-भगिनींची मागितली माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 04:17 PM2022-01-02T16:17:48+5:302022-01-02T17:25:46+5:30

मोहाडी येथे पोलिसांनी एका व्यापाऱ्याला अडवून केलेली मारहाण व पन्नास लाख रुपयाची लूट याचीच चर्चा होत आहे. तर, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या आमदार कारेमोरे यांनी केलेल्या शिवीगाळचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफी मागितली आहे.

mla raju karemore apologize for using abusive language to mohadi police | अखेर आमदार कारेमोरे नमले... माता-भगिनींची मागितली माफी

अखेर आमदार कारेमोरे नमले... माता-भगिनींची मागितली माफी

googlenewsNext
ठळक मुद्देपाेलिसांना शिवीगाळ करताना घसरली हाेती जीभ

भंडारा : सध्या मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयासमोर पोलिसांनी व्यापाऱ्याला केलेली मारहाण व पन्नास लाख रुपयाची लूट याचीच चर्चा होत आहे. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेले तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांनी पोलिसांना चक्क अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याबाबत आज आमदार कारेमोरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली आहे.

व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला होता. पोलिसांनी ५० लाख रुपयांची रोख रक्कम पळविल्याची आमदार मित्रांनी पोलिसात तक्रार केली. तर पोलिसांनीदेखील आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, पोलिसांना केलेल्या शिवीगाळचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आमदार कारेमोरे अडचणीत सापडले. आज त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले व जाहीर माफी मागितली. 'पोलिसांनी केलेली मारहाण व कारवाई करण्यास लावलेला विलंब यामुळे संतापून माझ्या तोंडून अपशब्द बाहेर आले. याबाबत मी माता-भगिनी व सर्व जनतेची जाहीर माफी मागतो', असे कारेमोरे माफी मागताना म्हणाले.

स्ट्रॉंगरुमचे पहारेकरी पोलीस स्त्यावर आले कसे..? कारेमोरेंचा सवाल

या प्रकरणाबाबत बोलताना कारेमोरे यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. व्यापाराला अडवून रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती. स्ट्रॉंग रुम १०० मीटर लांब असताना पोलिस बाहेर आले कसे? पोलिसांनी ५० लाख रुपये व ५ तोळ्यांची सोनसाखळीची रॉबरी कशी केली? त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती काय? रस्त्यावर येण्याचा पोलिसांचा उद्देश काय होता. पोलिसांचा पूर्वनियोजित कट होता काय, नशेत असणाऱ्या पोलिसांची ठाणेदारांनी मेडिकल तपासणी का केली नाही, याबाबतची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच, यासिन छव्वारे व त्यांच्या मित्राला पोलिसांनी जबर नशेत तर्र राहून मारहाण केली असा आरोपही कारेमोरे यांनी केला.

घटनेची नि:पक्ष चाैकशी करा

पोलिसांनी केलेली मारहाण व कारवाई करायला वेळ लागला त्यामुळे माझ्या संयमाचा बांध सुटला अन् अपशब्द बाहेर आले, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. या सर्व घटनेची निःपक्ष चौकशी झाली पाहिजे. मी या घटनेची निंदा करत असून, माझे चुकले असेल तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. यावेळी मोहाडी तालुका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, किसान सभेचे नेते माधवराव बांते व अन्य राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

तर आंदोलन करू 

रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा रस्ता रोको आंदोलन असल्याचा खोडसाळपणा कोणत्यातरी कार्यकर्त्यांनी केला. तसा आमचा काही कार्यक्रम नव्हता. पण, पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी दिला. दरम्यान, मावळत्या वर्षाच्या मध्यरात्रीच्या वेळी व्यापाराला केलेल्या मारहाणीचे व आमदारांनी दिलेल्या शिव्यांच्या घटनेचे दोन्ही बाजूने पडसाद उमटू लागले आहेत. 

Web Title: mla raju karemore apologize for using abusive language to mohadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.