डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 10:28 AM2022-02-08T10:28:25+5:302022-02-08T10:44:19+5:30

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी एका लग्नसोहळ्यात डीजेच्या तालावर चक्क ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

MLA raju karemore's dance video at a wedding goes viral | डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

डीजेच्या तालावर थिरकले आमदार; पाचगावचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्याच्या मुलीचा लग्नसोहळा

भंडारा :  आमदाराकडे पाहण्याचा समाजाच दृष्टीकोण वेगळा असतो. आमदाराचा एक मान-सन्मान असतो. वेगळा रुतबा असतो. मात्र, आपल्या कार्यकर्त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आमदारकीचा मान बाजूला ठेवत तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी एका लग्नसोहळ्यात डीजेच्या तालावर चक्क ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कमलेश कनोजे यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे सोमवारी होता. सकाळी ११ वाजता असलेल्या या सोहळ्याला आमदार राजू कारेमोरे उपस्थित होते. त्यावेळी डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी ताल धरून नाचत हाती. आमदार कारेमोरे यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी थेट डीजेच्या तालावर नृत्य सुरू केले. उपस्थितांनीही त्यांना चांगलीच दाद दिली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आमदाराच्या या दुसऱ्या रूपाने भंडारा जिल्ह्यातील नागरिक अचंबित झाले आहेत. कार्यकर्त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदारांची ताल धरला. मात्र, आता तोच व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

चर्चेतील आमदार

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोहाडी पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांसाठी मध्यरात्री पोहचून पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. त्यावेळचा व्हिडिओ चांगलाच गाजला होता. गुन्हे दाखल होऊन एक रात्र कारागृहातही राहावे लागले होते. कार्यकर्त्यांसाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे तुमसरचे आमदार तसेही नेहमी चर्चेत राहतात.

Web Title: MLA raju karemore's dance video at a wedding goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.