अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोबाईल वापसी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:29+5:302021-08-21T04:40:29+5:30
यावेळी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, मोबाईल व पोषण ट्रप ॲपसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, नादुरुस्त होणारे ...
यावेळी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, मोबाईल व पोषण ट्रप ॲपसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, नादुरुस्त होणारे जुने मोबाईल परत घेऊन नवीन जास्त रॅम असलेले मोबाईल देण्यात यावे, मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता मिळण्यात अनियमितपणा आहे तो दूर करण्यात यावा व भत्ता वाढवून देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी पवनी येथील प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत महिला व बाल विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी किसनाबाई भानावर, कल्पना साठवणे व मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
200821\img_20210820_135350.jpg
आंदोलनात सहभागी अंगणवाडी सेविका व मदतनीस.