८४ अंगणवाडी कर्मचाऱ्यांद्वारा शासनाला मोबाईल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:39+5:302021-09-10T04:42:39+5:30

लाखांदूर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे मोबाईल उपलब्ध करण्यात आले होते. तथापि, गत ...

Mobile returned to government by 84 Anganwadi workers | ८४ अंगणवाडी कर्मचाऱ्यांद्वारा शासनाला मोबाईल परत

८४ अंगणवाडी कर्मचाऱ्यांद्वारा शासनाला मोबाईल परत

Next

लाखांदूर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे मोबाईल उपलब्ध करण्यात आले होते. तथापि, गत काही वर्षांपूर्वी उपलब्ध करण्यात आलेल्या मोबाईल अंतर्गत अंगणवाडी कर्मचारी द्वारा शासनाला ऑनलाईन माहिती उपलब्ध केली जात होती. मात्र, मागील काही वर्षांपासून उपलब्ध करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध समस्या निर्माण झाल्याने शासनाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्गत ऑनलाईन माहिती उपलब्ध करण्यात खूप त्रास सहन करावा लागला, असा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, गत काही दिवसांपूर्वी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांद्वारा शासनाने नवीन मोबाईल उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाद्वारे या मागणीनुसार नवीन मोबाईल फोन उपलब्ध न करण्यात आल्याने ८ सप्टेंबर रोजी कुडेगाव १, कुडेगाव २, विरली बु. व बारव्हा, आदी ४ क्षेत्रांतर्गत तब्बल ८४ महिला कर्मचाऱ्यांद्वारा सीडीपीओ कार्यालयात मोबाईल वापसी करण्यात आले.

तथापि, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष किसना भानारकर यांच्या नेतृत्वात आयोजित मोबाईल वापसी आंदोलनांतर्गत तालुकाध्यक्ष पुष्पा हुमणे, उपाध्यक्ष अच्छेकला भुरले, सचिव शामकला सातव, सपना खोब्रागडे, कल्पना साठवणे, सुरेखा तलमले, कुंदा शिवणकर, दीप्ती तलमले, जिजा राऊत, शिल्पा खरकाटे, छबू राऊत, पंचशिला बोरकर, वर्षा माटे, कल्पना तुपटे यांसह अन्य महिला कर्मचारी उपस्थित होते.

090921\img20210908133429.jpg

मोबाईल परत करतांना तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी

Web Title: Mobile returned to government by 84 Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.