मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

By admin | Published: March 15, 2017 12:21 AM2017-03-15T00:21:47+5:302017-03-15T00:21:47+5:30

शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे.

Mobile users should release 'Lota' | मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

Next

सुधाकर आडे : देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
भंडारा : शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. परंतु त्याच हातात ग्रामीण भागात उघडयावर शौचास जाण्यासाठी टमरेलचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.
तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्रामपंचायत येथे हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सरपंच रिता मसरके, ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. बावनकुळे, उपसरपंच विरेंद्र दमाहे, सदस्य सुधीर मसरके, संजय बिरनवारे, मुकेश मुटकूरे, रंजना नागपूरे, आशा दमाहे, इंदू लिल्हारे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, रोजगारसेवक किरण दमाहे, आशा सेविका लिना बघोले, आॅपरेटर सुनिल लिल्हारे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आडे यांनी, तालुक्यात इतर गावांपेक्षा देव्हाडीची आदर्श म्हणून वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्याकरिता विचारसरणी स्विकारावी लागेल. मोबाईलच्या द्वारे जगाला हातात धरण्याची क्षमता ज्या नागरिकांच्या हातात आहे, त्याच हातात टमरेल दिसून येणे हे मानवांसाठी दुर्देवाची बाब आहे. गावातील उघड्या हागणदारीचे चित्र नाहिसे करणे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.
जिवनात एखाद्या शब्दानेही बदल घडविता येते परंतु तो शब्द मानवांच्या अंतकरणाला भिडला पाहिजे. त्याकरिता सामजिक दबाव महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला समाज जिवन घडविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ते घडविता येवू शकते. नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुटुंबाशी जुळावे लागेल. संवाद साधून संधीचे सोने करावे लागेल असे सांगितले व २० मार्च २०१७ पर्यंत वॉर्ड व गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले.
सर्वप्रथम गावाबाबतची शौचालय बांधकामाची स्थिती जाणून घेतली व सदस्य, वॉर्ड, दिवस निहाय नियोजन करून ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करावी व उघड्या हागणदारीचे समुह उच्चाटन करावे, असे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले. हागणदारीमुक्त गाव करून तुमसर तालुक्यात देव्हाडीची वेगळी ओळख निर्माण करण्याचे अभिवचन यावेळी उपस्थितांनी दिले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mobile users should release 'Lota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.