ना हातात बसतात, ना खिशात बसतात असे मोबाईलच चोरट्यांच्या सोयीचे ठरतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:26+5:302021-08-18T04:42:26+5:30
बॉक्स सतर्कतेची गरज... अँड्रॉईड मोबाईल हे आकाराने मोठे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मोबाईलसाठी सतर्क राहण्याची गरज आहे. मोठ्या ...
बॉक्स
सतर्कतेची गरज...
अँड्रॉईड मोबाईल हे आकाराने मोठे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मोबाईलसाठी सतर्क राहण्याची गरज आहे. मोठ्या आकाराचे मोबाईल हे शक्यतो बॅगमध्ये ठेवावे.
बॉक्स
चोरीच्या तक्रारी वाढल्या...
कोरोनामुळे अलीकडे काही दिवसांत रोजगाराच्या संधी कमी झाल्याने मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काही मोबाईल चोरटे हे सापडतात; तर काहींचे तपास मात्र अनेक दिवस लागत नाहीत.
बॉक्स
बसस्थानक, मोठा बाजार परिसरात मोबाईल सांभाळा...
भंडारा शहरातील बसस्थानक, मोठा बाजार परिसरात, भाजी बाजार तसेच बडा बाजार परिसर, राजीव गांधी चौक, गांधी चौक या परिसरातील चोरटे गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करत आहेत. मात्र नागरिकांनीही घराबाहेर करताना योग्य ती काळजी घेतल्यास आपण चोरीच्या घटना रोखू शकतो.