आधुनिक द्रोणाचार्याला न्यायाची प्रतीक्षा

By admin | Published: February 8, 2017 12:51 AM2017-02-08T00:51:44+5:302017-02-08T00:51:44+5:30

एशियन सायकलिंग ज्युनिअर महिला स्पर्धेत कास्यपदक पटकाविणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकांचे मागील नऊ महिन्यापासून वेतन बंद आहे.

A modern dentist waiting for justice | आधुनिक द्रोणाचार्याला न्यायाची प्रतीक्षा

आधुनिक द्रोणाचार्याला न्यायाची प्रतीक्षा

Next

नऊ महिन्यांपासून वेतन नाही : नियमबाह्य बदली
मोहन भोयर तुमसर
एशियन सायकलिंग ज्युनिअर महिला स्पर्धेत कास्यपदक पटकाविणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकांचे मागील नऊ महिन्यापासून वेतन बंद आहे. त्यांची जिल्हा परिषद प्रशासनाने नियमबाह्य बदली केली. आधुनिक द्रोणाचार्याला येथे न्यायाची प्रतिक्षा आहे. त्या आधुनिक द्रोणाचार्याचे नाव अ.वा. बुद्धे असून ते तुमसर तालुक्यातील ढोरवाडा येथील रहिवासी असून जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक आहेत.
एशियन सायकलिंग ज्यु. महिलांच्या स्पर्धा सध्या नवी दिल्लीत सुरू आहेत. सोमवारी भंडारा जिल्ह्यातील निलज गावातील सुशिकला आगाशेने २५० मीटर या सायकल शर्यतीत कास्यपदक जिंकले. तिथे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. सुशिकलाची खेळाची सुरूवात दावेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक अ.वा. बुद्धे यांनी केली होती. सुशिकलामधील गुण हेरून तिला प्रथम तुडका देव्हाडी येथे आठ महिने कसून प्रशिक्षण दिले होते. तेथून तिची निवड क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे झाली. पुढे ती साई स्पोर्टस अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया नवी दिल्ली येथे झाली.
शेतकऱ्यांच्या कन्येचे पुढील स्वप्न आॅलिम्पीक आहे. हा थक्क करणारा प्रवास घडविणारे आधुनिक द्रोणाचार्य अ.वा. बुद्धे मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मे २०१६ मध्ये भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाने अ.वा. बुद्धेंची बदली, लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे केली. १४ मे २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार क्रीडा उपक्रम यशस्विपणे राबविणाऱ्या शिक्षकाची बदली त्याच तालुक्यात करण्याचा आदेश आहे, परंतु येथे नियमबाह्य बदली करण्यात आली. अ.वा. बुद्धेंच्या क्रीडा मार्गदर्शन केंद्रातून आतापावेतो ९८ खेळाडू विभागीय, राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. मयुरी लुटे हिची अंडर १६ भारतीय संघात सम्यकलींग, श्रद्धा तिवारी हॉकी, आकाश शेंडे अ‍ॅथलेटीक्स हे खेळाडू सध्या ... मयुरी लुटे होते. राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. सध्या अ.वा. बुद्धे यांचा नऊ महिन्यापासून वेतन बंद आहे. न्यायालयाने स्टेटस को जैसे थे असा आदेश येथे दिला आहे. पहाटे चार ते सकाळी सात व संध्याकाळी ५ ते ७ तुडका येथील बड्डा क्रिडांगणावर खेळाडूंना ते मार्गदर्शन करीत आहेत.
विनाशुल्क व शासकीय मदतीविना मागील १० वर्षापासून ते खेळाडू घडविण्याचे काम करीत आहेत. निदान शासनाने मदत केली नाही. परंतु किमान सुड घेऊ नये असा सुर सध्या तालुक्यात उमटत आहे. प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षकाला येथे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. वेतन बंद असले तरी त्यांची खेळाडू घडविण्याची भूक तशीच आहे.

Web Title: A modern dentist waiting for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.