बदलत्या आधुनिक जगाप्रमाणे विद्यार्थ्यांनो स्वत:मध्येही बदल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:43+5:302021-09-16T04:43:43+5:30
याप्रसंगी भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे माजी अधिव्याख्याता दत्तात्रेय केळकर, अधिव्याख्याता गजानन भोकरे, ...
याप्रसंगी भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड, अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे माजी अधिव्याख्याता दत्तात्रेय केळकर, अधिव्याख्याता गजानन भोकरे, नूतन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मुकुंदराव वझलवार, सचिव रवींद्र भालेराव, राधेश्याम लाहोटी, मुख्याध्यापक आर. एस. बारई, उल्हास फडके, शहारे, चैतन्य उमाळकर, विज्ञानप्रमुख मनोज नडंगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी अटल लॅबच्या माध्यमातून नवीन संशोधक, इंजिनीअर निर्माण होऊ शकतील, असे सांगितले. संस्था सचिव रवींद्र भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अटल लॅब खूप मोठा दुवा ठरणार असून यामुळे विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होणार असल्याचे सांगितले. केळकर यांनी अटल लॅब हा केवळ शैक्षणिक उपक्रम नाही तर व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोन असून नीती आयोग म्हणजे नॅशनल इनोव्हेशन इन ट्रॉफॉर्मिंग इंडिया आहे. अटलजींचे व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रहित प्रथम त्या राष्ट्रहिताला समोर ठेवूनच या अटल लॅबचे कार्य घडावे व जास्तीतजास्त जणांना रोजगार उपलब्ध होऊन अटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले. संचालन तिबुडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक राठी यांनी मानले. अटल लॅब निर्मितीसाठी नडंगे, निनावे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
अटल लॅब विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांना शालेय वयातच अनेक वैज्ञानिक वस्तू अटल लॅबमधून सहजपणे हाताळता येणार असल्याने या लॅबच्या माध्यमातून भविष्यात लाहोटी विद्यालयातील विद्यार्थी वैज्ञानिक, संशोधक, इंजिनीअर तयार होतील व शाळेसह आपल्या जिल्ह्याचा, देशाचा नावलौकिक करतील, असे लाहोटी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एस. बारई यांनी सांगितले. यासाठी संस्था पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, भंडारा पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाचे मिळालेले सहकार्य कधीही विसरता येणार नसल्याचे बारई यांनी सांगितले.