मोहाडी-खमारी रस्त्यांचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:09 AM2019-05-23T00:09:35+5:302019-05-23T00:10:17+5:30

चौंडेश्वरी मंदिर, मांडेसर, खमारी रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा फज्जा उडविला आहे. रस्ता खोदून एक महिना लोटला तरी रस्ता तसाच पडून आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी व मुरुमाचे ढेले पडलेले आहेत. या रस्त्याने येणाºया जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या वर असून विद्यार्थ्यांना व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Mohadi-Khamari road work is in disarray | मोहाडी-खमारी रस्त्यांचे काम निकृष्ट

मोहाडी-खमारी रस्त्यांचे काम निकृष्ट

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला पाठबळ : रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : चौंडेश्वरी मंदिर, मांडेसर, खमारी रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करून कंत्राटदाराने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा फज्जा उडविला आहे. रस्ता खोदून एक महिना लोटला तरी रस्ता तसाच पडून आहे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गिट्टी व मुरुमाचे ढेले पडलेले आहेत. या रस्त्याने येणाºया जाणाऱ्यांची संख्या हजारोंच्या वर असून विद्यार्थ्यांना व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे आहे.
संशोधन व विकास कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविल्या जात आहे. पूर्वी ही योजना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बिड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविल्या जात होती. ही बाब आमदार चरण वाघमारे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यावर अभ्यास केला.
योजना क्षेत्रातच नाही तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविता यावी म्हणून प्रयत्न केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. मोहाडी आणि तुमसर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अनेक रस्त्याचे काम पूर्ण झाले असून काही रस्त्याचे काम सुरू आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्या काळात डांबरी रस्ते तयार करण्यात आले होते.
त्यानंतर आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत काम करणारे काही कंत्राटदार उत्कृष्ट काम करीत आहेत तर, काही कंत्राटदार निकृष्ट कामे करून चांगल्या योजनेचा फज्जा उडवित आहेत. असाच प्रकार मोहाडी चौंडेश्वरी मंदिर, मांडेसर, खमारी रस्त्यांचे थातूरमातूर काम करून तिन्ही कंत्राटदार अतोनात पैसा कमावण्याचा मार्ग मोकळा करीत आहे. बिलो टेंडरच्या गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामात भ्रष्टाचार सुरू आहे.
सदर रस्त्याची सर्वसामान्य माणसाला जाणीव व्हावी, कामाची किंमत, रस्ता कोणत्या योजने अंतर्गत, रस्त्याचे प्रकार, रस्त्याची लांबी रुंदी व इतर माहितीसाठी फलक एक महिन्याआधी लावला जातो. परंतु काम सुरु होताच तो फलक गायब केला जातो. सदर बांधकाम प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सदर बांधकाम भंडारा, तुमसर येथील कंत्राटदार करीत असून सदर मार्गाचे बरेच काम पूर्णत्वाला आले आहे. बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.
सदर रस्त्याच्या कामावर टाकलेली गिट्टी कमी प्रमाणात आहे. तसेच तेथे वापरलेला मुरुम हा मातीमिश्रीत असून मोठमोठाले टोळ मुरुमामध्ये मिक्स केलेले आहेत. मुरुम इस्टीमेटनुसार टाकलेला नाही. गिट्टीचा साईज सुद्धा योग्य नाही. रस्त्यावर कोटिंग पाण्याअभावी पूर्ण झाली आहे.
रस्त्याची लेव्हलिंग ओबडधोबड करण्यात येत आहे, असे प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर लक्षात येते.
या कामासाठी शासनाने दिलेल्या निधीचा दुरुपयोग होत असून संबंधीत अधिकाºयांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सदरील कामाची पाहणी करुन खराब मुरुम, कमी असलेली गिट्टी व निकृष्ट रस्ता बांधकामाची पाहणी करुन दोषी असणाºया कंत्राटदार व अधिकाºयावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोहाडी, चिंचखेडा, मांडेसर, खमारी, पिंपळगाव, खुटसावरी, कान्हळगावं, सिरसोली येथील नागरिकांनी केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास जनआंदोलनाचा इशारा आहे.

मुख्यमंत्री योजनेला डच्चू?
मुख्यमंत्री नावानेच सुरू असलेल्या ग्राम सडक योजनेंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्याचेच काम निकृष्ट होत आहे. यातून बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार प्रधानंत्र्यांच्याच योजनेला डच्चू देत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहेत.

जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला खिंडार पडला असून, सर्व ठिकाणी अपघाताला बळी पडत आहे, ही योजना केवळ कंत्राटदार, अधिकाºयाचे पोट भरण्याचे साधन आहे, रस्त्यांचे काम इकडे तिकडे सर्व थातूर मातूर होत आहे याकडे प्रशासन व शासन प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे, मोहाडी ते मांडेसर रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी.
-गजानन झंझाड, बुथ अध्यक्ष, तुमसर विधानसभा काँग्रेस कमिटी
रस्त्यावर दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गिट्टी मुरूम पसरल्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतले आहे, कंत्राटदार आपल्या मनमर्जी ने काम करीत आहे, अधिकाºयांचे कामावर दुर्लक्ष दिसून येत आहे. काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची चौकशी करावी.
-अशोक मुटकुरे, ग्रा.प.सदस्य, मांडेसर.

Web Title: Mohadi-Khamari road work is in disarray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.