केंद्र सरकारविरोधात ‘आयटक’चे मोहाडीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:26 PM2018-09-02T21:26:28+5:302018-09-02T21:27:08+5:30
केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : केंद्रातील भाजपचे सरकार विविध पातळीवर अपयशी झाले आहे. आभास, स्वप्नाचा जगात भुरळ पाडण्यात यशस्वी झाली. मोदी सरकारचे धोरण किसान, कामगार, कर्मचारी, मजूर आदींच्या विरोधी आहे. त्या धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेच्या मागणी दिवसानिमित्त मोहाडी येथे आयटक व किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्याद्वारे राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दरवर्षी १ सप्टेंबर ‘किसान मागणी’ दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त संपूर्ण देशव्यापारी शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेवून मोर्चा, निदर्शने किसान सभेने ठरविले होते. त्या अनुषंगाने शेतकरी, कामगार, कर्मचारी आदींचा मागण्यासाठी किसान सभा व आयटक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार बाजार मोहाडी येथून मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे सचिव माधवराव बांते, सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, अल्का बोरकर, गौतमी धवसे, शालू कापसे आदीनी केले.
तहसील कचेरीसमोर मोर्च्याचे रुपांतर सभेत करण्यात आले. यावेळी सभेला आयटकचे कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, सदानंद इलमे, अल्का बोरकर यांची भाषणे झाली. भाषणातून भाजपाच्या कामगार विरोधी धोरणाचा समाचार घेण्यात आला. नोटाबंदीने लहान व्यापारी मागे गेले, बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, अंगणवाडी बंद करण्याचा डाव आहे असे अनेक विषय सामान्यांच्या हिताचे नाहीत, असे भाषणातून नेत्यांनी सांगितले. निवेदनात, केंद्र शासनाने कामगार विरोधी धोरण बदलावे, असंघटीत कर्मचारी अंगणवाडी सेविका, सहायीका, आशा कामगार, शालेय पोषण आहार शिजविणारे कर्मचारी, ग्रा.पं. कर्मचारी यांना १८ हजार वेतन दिला जावा, नोकरीची शाश्वती देण्यात यावी, पेंशन, ग्रॅच्युईटी, बोनस, जीपीएफ व सामाजिक संरक्षण देण्यात यावे, अंगणवाडीच्या संबंधातील १६ जूनचा परिपत्रक रद्द करावा, विना अट कर्जमाफी द्यावे, धान उत्पादकांना तीन हजार रुपये प्रति क्विंटल किंमत द्यावी, १ आॅक्टोंबरपासून धान खरेदी केंद्र सुरु करावे, धान केंद्रावर तात्काळ पैसा व बारदाना देण्यात यावा, स्वामीनाथन शिफारशी लागू करा, ६० वर्षीय शेतकऱ्यांना पाच हजार पेन्शन द्या, शेतकऱ्यांच्या हिताची पीक विमा सुरु करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
मोर्च्यात गजानन लाडसे, राजकुमार बोंद्रे, गौरीशंकर धुमनखेडे, शेवंती खापरीकर, कल्पना झोडे, विजया नंदनवार, नितीन मोहारे, जयप्रकाश मसरके, हेमराज बिरणवार, उमेश दमाहे, संतोष शिदोरे, जयसिंग कस्तुरे, उमेश लिल्हारे, छत्रपती कस्तुरे आदी किसान सभा व आयटकचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.