मोहाडीचे ग्रामीण रुग्णालयच सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:57+5:302021-07-07T04:43:57+5:30

बॉक्स रुग्णालयाचा अजब कारभार रुग्णालयातील एका लिपिकाने आपले बस्तान मागील दीड वर्षापासून रुग्णालयातच मांडले असून, ते इतरत्र राहण्याऐवजी रुग्णालयातच ...

Mohadi's rural hospital is on saline | मोहाडीचे ग्रामीण रुग्णालयच सलाइनवर

मोहाडीचे ग्रामीण रुग्णालयच सलाइनवर

Next

बॉक्स

रुग्णालयाचा अजब कारभार

रुग्णालयातील एका लिपिकाने आपले बस्तान मागील दीड वर्षापासून रुग्णालयातच मांडले असून, ते इतरत्र राहण्याऐवजी रुग्णालयातच राहत आहेत. रुग्णालयाचे शासकीय निवास अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेले नसताना एका डॉक्टरला दोन खोल्या देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीकडेही लक्ष दिले जात नाही. महिला वॉर्डात असुविधा असल्याची महिला रुग्णांची तक्रार आहे. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांत नेहमी भांडणे होतात, असा अजब कारभार येथील रुग्णालयात सुरू आहे.

बॉक्स

रुग्णांना देतात रेफर टू भंडाराचा सल्ला

‘रेफर टू भंडारा’ हे येथील रुग्णालयाचे ब्रीदवाक्य बनले आहे. एमबीबीएस डाॅक्टरांकडून तपासणी व औषधोपचार अपेक्षित असताना त्यांनी हे काम आयुष विभागाकडे सोपविले आहे. अनेक सामान्य रोगाच्या रुग्णांनाही येथे उपचार उपलब्ध करून देण्याऐवजी भंडारा रेफर करणे एक पद्धतच बनली आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांना एमबीबीएस डाॅक्टरांअभावी योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना नाइलाजाने खासगी डाॅक्टरांकडे जाऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लोकप्रतिनिधी व उच्च अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Mohadi's rural hospital is on saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.