येरली परिसरात राजरोसपणे मोहफुलाच्या दारूचे धंदे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:48+5:302021-06-02T04:26:48+5:30

तालुक्यातील पिपरा, आगरी, नवरगाव, उमरवाडा, झारली, येरली येथील डोंगरवाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली जाते. लॉकडाऊनकाळात विदेशी ...

Mohafula liquor business started in Yerli area | येरली परिसरात राजरोसपणे मोहफुलाच्या दारूचे धंदे सुरू

येरली परिसरात राजरोसपणे मोहफुलाच्या दारूचे धंदे सुरू

Next

तालुक्यातील पिपरा, आगरी, नवरगाव, उमरवाडा, झारली, येरली येथील डोंगरवाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळली जाते. लॉकडाऊनकाळात विदेशी दारूचे भाव वधारल्याने रोज पिणाऱ्या तळीरामांचा मोर्चा हा गावठी दारूकडे वळला असून या परिसरात अवैध गावठी दारूवाले जास्त फोफावल्याचे चित्र आहे. तालुक्यातील या परिसरातील गावात हातभट्टी आणि गावठी दारूच्या उत्पादनांसाठी जंगलांचा वापर केला जातो आहे. यामुळे या जंगलाचा फायदा घेत सर्रास गावठी दारूची विक्री होत आहे. पोलीस प्रशासन मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. गावठी दारू ही आतिशय घातक असून सुरवातीला अवैध दारू तयार करण्यासाठी नवसागर, काळा गूळ यासारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र सध्या दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे. तसेच गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहेत. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसपंदा अडचणीत येत आहे.

तुमसर पोलीस प्रशासनाकडून अवैध दारू विरोधात केसेस केल्या जात असल्या तरी अवैध दारूची निर्मिती बंद झालेली नाही. दारूच्या भट्ट्यांवर कारवाईपेक्षा अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जोपर्यंत अशी अवैध दारू निर्मितीची केंद्र उद्ध्वस्त होणार नाही तोवर हा प्रश्न कायमचा सुटणार नाही, असे मत सामान्य लोक व्यक्त करत आहेत.

Web Title: Mohafula liquor business started in Yerli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.