मोहाडी बंद; लाखांदुरात निवेदन

By admin | Published: August 21, 2016 12:26 AM2016-08-21T00:26:07+5:302016-08-21T00:26:07+5:30

पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदार रामचंद्र अवसरे यांना त्वरीत अटक करून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा,

Mohali closed; Millions of requests | मोहाडी बंद; लाखांदुरात निवेदन

मोहाडी बंद; लाखांदुरात निवेदन

Next

अवसरे यांच्या अटकेची मागणी : मोहाडीत राविकाँ रस्त्यावर
मोहाडी : पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदार रामचंद्र अवसरे यांना त्वरीत अटक करून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस तालुका मोहाडीतर्फे आज मोहाडी बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे मोहाडी येथील ७० टक्के दुकाने बंद ठेवण्यात आली. गांधी चौकापासून शांतता मोर्चा काढून तहसील कार्यालयात नेण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
भंडाराचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई राजु साठवणे यांना मारहाण केली होती. त्याचा निषेध म्हणून आमदारांना अटक करण्याच्या मागणीसाठी शाळा, महाविद्यालयाला सुटी दिली. गांधी चौक मोहाडी येथून शांतता मोर्चा काढण्यात आला. सात दिवसात आमदार अवसरे यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महासचिव विजय पारधी, शहर अध्यक्ष शोमल गजभिये, विनोद बाभरे, किशोर पातरे, बापु वंजारी, ज्ञानेंद्र आगाशे, मनिष पराते, अफरोज पठाण, बादल गायधने, हितेश साठवणे, हानीश शेख, लकी शेख, नगरसेवक मनिषा गायधने, कौसल्या निखारे, प्रमिला साकुरे, जयश्री गायधने, पप्पु समरीत, महेश पारधी, जितेंद्र आकरे, यश बागडे, शाहरूक शेख, संदेश लोणारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
लाखांदूर : लाखांदूर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. भारनियमन ताबडतोब बंद करून २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा. इतर मागास वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी. वेगळ्या विदर्भाचे राज्य निर्माण करून दिलेली आश्वासन पूर्ण करावे, तिरंगा यात्रेदरम्यान तुमसर येथे १७ आगस्टला भंडाराचे आमदार अवसरे यांनी कर्तव्यातील पोलीस शिपायाला मारहाण केली. त्यामुळे अवसरे यांना अटक करावी, अशा विविध मागण्यासंदर्भात निवेदन सादर करून सोडविण्याची मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, सभापती मंगला बगमारे, उपसभापती वासुदेव तोंडारे, नगरसेवक रामचंद्र राऊत, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, रामचंद्र परशुरामकर, जयगोपाल लांडगे, नगरसेविका निलिमा हुमाणे, दुर्गा पारधी, निकष दिवटे, ताराचंद मातेरे, मधुकर पारधी, भोजराज राऊत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mohali closed; Millions of requests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.