मोहाडीत राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलन आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:33 PM2017-11-11T23:33:37+5:302017-11-11T23:33:57+5:30

श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलन १२ नोव्हेंबरला माता चौंडेश्वरी मंदिर परिसर, मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

Mohali State-level National Youth Literature Meet | मोहाडीत राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलन आज

मोहाडीत राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलन आज

Next
ठळक मुद्देउद्घाटनाला येणार वनमंत्री : चौंडेश्वरी मंदिर प्रांगणात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलन १२ नोव्हेंबरला माता चौंडेश्वरी मंदिर परिसर, मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोहाडी गावाला प्रथमच आयोजनाचा मान मिळाला असून हे संमेलन यशस्विरित्या संपन्न व्हावे, यासाठी आयोजकांची जय्यत तयारी झाली आहे.
देशातील युवक हा राष्ट्राचा आधारस्तंभ असून, राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी या संमेलनाचे प्रयोजन आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, विशेषांक प्रकाशन, समूहगान, सामाजिक ग्रामोत्थान चळवळ, समाजप्रबोधन, महिलोन्नती, युवा जागृती व कृषी संदेश अशा विविध विषयांचा परिसंवादात समावेश आहे.
१२ नोव्हेंबरला सकाळी ५.३० ला प्रभाकर पराते यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान व चिंतन ६.३० वाजता बाळूभाऊ बारई यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ६.४५ ला ग्रंथदिंडी काढण्यात येईल. नरेश दिपटे, आशिष पात्रे, प्रेमरतन दमानी यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात येईल. ९.३० ला आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन होईल.
संमेलनाचा उद्घाटन सोहळा सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. उद्घाटक वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. संमेलनाध्यक्षपद गुरूकुंज मोझरीचे डॉ. प्रा. भास्करराव विघे भूषवतील. स्वागताध्यक्ष ग्रामगीता स्फूर्ती सेवाश्रमचे अध्यक्ष गौरीशंकर नागफासे, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, भूदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहतील. विशेष पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी, डॉ. राजाराम बोथे, चित्रकार प्रदीप पवार, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव, नगराध्यक्ष स्वामी निमजे, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष केशवराव निर्वाण, लायन्स क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. विनोद भोले उपस्थित राहतील.
त्यानंतर क्रमश: निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ती कराने, आजच्या आधुनिक काळात शेतकºयांच्या उत्थानासाठी ग्रामगितेची गरज, राष्ट्रसंतांच्या युवा क्रांतीची दिशा या विषयावर तीन परिसंवाद होतील. या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे नलिनी कोरडे, चंद्रकांत बोरकर, सुशील बुरडे, नारायण धकाते यांनी केले आहे.

Web Title: Mohali State-level National Youth Literature Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.