मोहाडीत तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:56 PM2017-12-07T23:56:16+5:302017-12-07T23:57:04+5:30
धान्य वाटप करणारे दुकान बदलविण्यात यावा व अन्य मागणीसाठी आज दुपारी मोरगाव येथील नागरिकांनी मोहाडी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला.
आॅनलाईन लोकमत
मोहाडी : धान्य वाटप करणारे दुकान बदलविण्यात यावा व अन्य मागणीसाठी आज दुपारी मोरगाव येथील नागरिकांनी मोहाडी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. अखेर शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यासाठी तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी दुकानदार बदलवून दिले.
प्रशासनाने केरोसिन धान्य याच्या साठ्याची चौकशी केली नाही. मोरगाव येथील दुकानदारावर अफरातफरी संबंधी फौजदारी कारवाई झाली. धान्य अफरातफरीची वसुली करण्याचे आदेश झाले. मंत्र्यांनी सुनावणी न घेता सदर धान्य दुकानदाराला स्थगीती दिली. संतप्त झालेल्या मोरगावच्या शिधापत्रिका धारकांनी मनिषा रामटेके यांचेकडून धान्य उचल न करण्याचा निर्णय घेतला.
मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार मनिषा रामटेके यांनी धान्य व केरोसीन वाटपात घोटाळा केला. या आरोपावरून मोरगावच्या नागरिकांनी मागील दहा महिन्यापासून निवेदन, मोर्चे, उपोषण असा लढा लढला. अखेर प्रशासन त्या दुकानाची चौकशी करून दुकानदाराला चौकशी अहवालात दोषी ठरविले. धान्य साठ्याची अफरातफरीची वसुली करण्याचे आदेश केवळ तीन वर्षाचे झाले होते. केरोसीन साठ्याची चौकशीच करण्यात आली नाही. एप्रिल २०१२ ते मार्च २०१४ पर्यंत धान्य साठा अफरातफरीची चौकशी झाली नाही. सदर दुकानदारावर २६ लक्ष ८७ हजार धान्य अफरातफरीची वसुली करण्याचे आदेश झाले. मोहाडी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांनी २१ जून २०१७ च्या जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांच्या आदेशाला स्थगिती दिली. या प्रकरणात मंत्र्यांनी सुनावणी घेतली नाही. गावात सदर दुकानदार, प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त होत होता. दुकानदारासाठी स्थगीती आदेश असल्याचा तहसिलदार मोहाडी यांनी पत्र काढला. दुकानदारांनी धान्यसाठा उचल केला. पण दुकानदारांजवळून धान्य उचलायचेच नाही असा निर्णय आॅक्टोबरमध्ये गावकºयांनी घेतला. गावकºयांनी धान्याची उचल करावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले अखेर. गावकºयांच्या एकीपुढे प्रशासनाची काही चालली नाही. झालेल्या चर्चेत, मोरगाव येथील धान्य वाटप सिमा चव्हाण तर महालगावचे धान्य वाटप मनिषा रामटेके करणार आहेत. तहसिलदार यांच्याशी चर्चा निवेदन सरपंच तुलाराम हारगुळे, उपसरपंच बबिता उके, श्रीधर भुते, हिरकन्या हारगुळे, शिल्पा शहारे, सुधाकर बुरडे, गंगाराम भुते, पंढरी अतकरी, अशोक धारगावे, उमेश बुराडे, कैलास हारगुळे, किरण हारगुळे, मोरेश्वर भुते, मधुकर बुरडे, संपत भोयर, दुर्गा ढबाले, मंदा मारबते आदी उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकाºयांना पाठविले पत्र
आंतर दुकान बदलीचा विषय तालुका दक्षता समितीमध्ये २८ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला होता. समितीचे अध्यक्ष आ. चरण वाघमारे उपस्थित होते. निर्देशानुसार डिसेंबर २०१७ पासून धान्य वाटपाकरिता रास्तभाव दुकानदार महालगावच्या सिमा चव्हाण मोरगावचे धान्य वाटप करणार आहेत तर महालगावचे धान्य मनिषा रामटेके करणार आहेत. याचेपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे तहसिलदार मोहाडी यांनी पत्र पाठविले आहे.