मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:28 PM2017-08-27T22:28:36+5:302017-08-27T22:29:07+5:30

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा,

Mohdita shadowed by the Shiv Sena | मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना घेराव: जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर जिल्हास्तरीय धडक मोर्चा नेण्यात आला. यात तहसीलदारांना घेराव घालून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मोहाडी व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चा मोहाडी तहसील कार्यालयावर पोहचताच तहसीलदार सुर्यकांत पाटील घेराव करून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी अनेक मुद्द्यावर गंभीर आक्रमक चर्चा केली. शासनाने एकूण किती कर्जमुक्तीचे केंद्र मंजूर केले आहेत. यापैकी प्रत्यक्षात किती केंद्र सध्या सुरु आहेत. आजपर्यंत किती शेतकºयांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यात आले, किती वेळ आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. अधिकारी एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांना मोर्चाच्या माध्यमाने प्रत्येक शेतकºयांचे शेतीचे वेगवेगळे पंचनामे घेण्याचा आग्रह केला. अनेक शेतकºयांनी पाण्याअभावी रोवणी केलीच नाही. जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे कालवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. ते त्वरीत दुरुस्त करून देण्यात यावे. यावर्षी पाऊस कमी बरसल्यामुळे भीषण दुष्काळ पडण्याचे १०० टक्के चित्र जिल्ह्यात निर्माण झाले असल्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
अनेक लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाचे पैसे मिळाले नाहीत ते सर्व लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावे, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत येणाº्या लाभाथ्याना सहा-सहा महिने मानधन मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आमदार, खासदार, यांचे सुद्धा वेतन सहा-सहा महिन्यांनी देण्यात यावे. अशाप्रकारे होत असलेल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही. असा खणखणीत इशारा मोर्च्याच्या माध्यमातून देण्यात आला. या मोच्यार्चे नेतृत्व शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले व जिल्हा सह संपर्क प्रमुख दिपक शेंद्रे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, माजी जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, रामसिंग बैस, राजेश बुराडे, संदीप वाकडे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख पवन चव्हाण, नरेश उचीबघले, भरत वंजारी, किशोर चन्ने, अरविंद बनकर, राजेंद्र ब्राम्हणकर, शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, महेश पटले, दिनेश पांडे, मुकेश थोटे, मनोज चौबे, राजेंद्र भांडारकर, प्रमोद गायधने, मोहीन रहमान शेख, मनोहर जांगळे, प्रकाश लसुन्ते, जगदीश त्रिभूवनकर, विवेक भोन्डेकर,नरेश टेंभरे, जयदेव चौधरी, विनोद राहांगडाले, अश्विन जगणे, अंकुश पटले, रमेशचंद्र रामटेके, अशोक कडव, विजय अटराहे, विनोद शामकुवर, योगराज टेंभरे, योगेश सोनकुसरे, श्याम बिसने, प्रकाश चौधरी, शुभम ठाकरे, सचिन राहांगडाले, नागेश शरणागते, जीवन डोये, कुंजीलाल पटले, गोवर्धन मारवाडे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Mohdita shadowed by the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.