धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 08:10 PM2022-04-13T20:10:26+5:302022-04-13T20:10:55+5:30

Bhandara News धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर तरूणाने अतिप्रसंग करण्याची घटना साकोली ते नागपूर मार्गावर प्रवासादरम्यान मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

Molestation on a minor student in a speeding bus; Accused in police custody | धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

Next
ठळक मुद्देसाकोली ते नागपूर महामार्गावरील घटना

भंडारा : धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर तरूणाने अतिप्रसंग करण्याची घटना साकोली ते नागपूर मार्गावर प्रवासादरम्यान मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी याप्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी साकोली ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील बोदरा येथून तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर येथे फिरायला जाऊ असे सांगत त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला सोबत नेले होते.

राजेश ईश्वर मडावी (१९) रा. बोदरा ता. साकोली असे तरूणाचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला नागपूर येथे फिरायला जाऊ असे सांगितले. मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजता नागपूरकडे जाणाऱ्या गोंदिया नागपूर बस (क्रमांक एमएच ४० वाय ५२६२) मध्ये राजेशने अल्पवयीन विद्यार्थीसह साकोली वरून प्रवास सुरू केला. बसमध्ये साकोली वरून ११ प्रवासी प्रवास करीत होते. रात्रीची वेळ असल्याने आणि बसमध्ये वाहक नसल्याचे पाहून आरोपीने बसच्या मागच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला. बसने नागपूरला पोहोचल्यानंतर राजेशने तिला घेऊन आपल्या नातेवाईकाकडे गेला. नातेवाईकला त्यांची उपस्थिती संशयित वाटल्याने ताबडतोब घरून निघून जाण्याचे सांगितले. त्यानंतर राजेश व त्या अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा येथे परतले.

दरम्याने बुधवारी सकाळी साकोली ठाण्यात वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता असलेली विद्यार्थिनी राजेश मडावीसाेबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ बोदरा गाव गाठून अल्पवयीन विद्यार्थिनी व राजेश मडावी यांना ताब्यात घेतले.  दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या आधारावर पोलिसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर कलम भादंवि ३७६, ३६३ आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमान्वये  गुन्हा दाखल केला आहे. तपास साकोलीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.

Web Title: Molestation on a minor student in a speeding bus; Accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.