साकोली येथे मुद्रा प्रचार व प्रसार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:46 PM2019-03-01T22:46:19+5:302019-03-01T22:46:34+5:30
ग्रामीण भागातील छोट््या उद्योग धंद्याना चालना देण्यासाठी शासनाने मुद्रा योजनेची व्यवस्था ग्रामीण बेरोजगार व्यावसायीकांसाठी केली असुन कर्ज घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर करण्यासाठी प्रचार व प्रसार मेळावे घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार बी. डी. टेढे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : ग्रामीण भागातील छोट््या उद्योग धंद्याना चालना देण्यासाठी शासनाने मुद्रा योजनेची व्यवस्था ग्रामीण बेरोजगार व्यावसायीकांसाठी केली असुन कर्ज घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वदूर करण्यासाठी प्रचार व प्रसार मेळावे घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन तहसीलदार बी. डी. टेढे यांनी केले.
साकोली येथील मंगलमूर्ती सभागृहात आयोजित मुद्रा प्रचार व प्रसार मेळाव्याचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुद्रा समन्वय समितीचे सदस्य राजेश बांते होते, याप्रसंगी अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक आर.एल. खांडेकर, जिल्हा ग्रामीण स्वयरोजगार योजनेचे व्यवस्थापक एन. वाय. सोनकुसरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्ही. पी. तोंडरे, अणासाहेब पाटील महामंडळाचे एल. एल. हुमे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेविका गिता बडोले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. एल. जाधव, व्यवस्थापक कॅनरा बँकेचे एच. एल. चरमार, एसबीआयचे पालीवाल, बँक आॅफ इंडियाचे बोरकर, विदर्भ ग्रामीण कोकण बँकेचे व्ही. जे. बारसे, युनियन बँकेचे यादव आदी उपस्थित होते.
तहसीलदार बी. डी. टेढे म्हणाले, शासनाने सुरु केलेल्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारांनी मुद्रा कर्ज घेवुन व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधावी.
राजेश बांते यांनी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून गरीब व आर्थिक दृष्टीने मागासलेल्या बेरोजगार युवकांना रोजगारासाठी मुद्रा कर्ज व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. युवकांनी व्यवसायाचे निश्चित ध्येय ठेवून मृद्रा योजनेतून कर्ज घ्यावे व आपल्या व्यवसायाची प्रगती साधून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करावी. आपली आर्थिक उन्नती करावी.
कार्यक्रमात मुद्रा योजनेतील विविध बँकेतून कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.
द्वितीय सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित युवक-युवती बेरोजगारांना मुद्रा योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एल. जाधव यांनी तर, संचालन आभार प्रदर्शन सतीश आठवले यांनी केले. मेळाव्यात बहुसंख्येने परिसरातील बेरोजगार, युवक, युवती, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी नागरीक महिला व भगिनी उपस्थित होत्या.