नवेगाव येथे बोगस रोहयो कामे दाखवून हडपली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:47+5:302021-09-24T04:41:47+5:30
रोहयो नालासरळीकरणाच्या कामाचे निरीक्षण केल्यास कामात २० लक्ष रुपये कसे व कुठे खर्च झाले, काय काम करण्यात आले, याचा ...
रोहयो नालासरळीकरणाच्या कामाचे निरीक्षण केल्यास कामात २० लक्ष रुपये कसे व कुठे खर्च झाले, काय काम करण्यात आले, याचा अंदाज येत नाही. झालेली कामे दिसून येत नाही. या कामात रोहयो तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक, सरपंच, ग्रामसेवक यांनी गौडबंगाल व काही खास मजुरांशी साठगाठ करून त्याचे नावे मस्टर भरून बोगस कामे दाखविल्याचे दिसून येत आहे. तसेच कामाची रक्कम संबंधित खास मजुरांच्या नावे काढून खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर अर्धी रक्कम मजुरांकडून परत मागून अफरातफर केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नाला सरळीकरण कामातील रक्कम गैरप्रकार करून बोगस कामे दाखविण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
...तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा
नवेगाव बुज येथील रोहयो गैरप्रकार प्रकरणी मोहाडी खंडविकास अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून चौकशी करावी. रोहयो तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक, सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. चौकशी व दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर लढाई लढली जाईल, असा इशारा मोहाडी तालुका शिवसेनाप्रमुख अनिल सार्वे यांनी खंड विकास अधिकारी मोहाडी, रोहयो व नियोजन विभाग प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त रोहयो नागपूर, रोहयो तक्रार निवारण अधिकारी रोहयो भंडारा, सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत नवेगाव बुज यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.