मान्सून दाखल खरा, पण पाऊसच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2016 12:27 AM2016-06-21T00:27:29+5:302016-06-21T00:27:29+5:30
मान्सून अर्थात नैरूत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरावरून विदर्भात दाखल झाल्याची पुस्टी हवामान खात्याने केली.
ढगांनी आच्छादले आभाळ : तापमान कमी, पेरण्या थांबलेल्याच, मृग कोरडाच, हवामान अंदाज फोल ठरला
पालांदूर : मान्सून अर्थात नैरूत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरावरून विदर्भात दाखल झाल्याची पुस्टी हवामान खात्याने केली. शुक्रवारपासून सोमवारपर्यंत आभाळ ढगांनी आच्छादले आहे. मात्र पाऊस पडलाच नसल्याने मृग नक्षत्र कोरडाच गेला आहे.
पूर्व विदर्भात मान्सून दाखल होताच सर्वदूर पाऊसाची अपेक्षा निश्चित असते परंतु ४ दिवस लोटूनही मान्सून न बरसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचा थेट परिणाम शेती हंगामाला बसला असून आतापर्यंत केवळ २५ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात ५ टक्केच पेरण्या सुरक्षित म्हणजे सिंचन क्षेत्रातील आहेत. कोरडवाहूची पेरणी धोक्यात आली असून पाऊस न पडल्यास हंगाम लांबण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
सोमवारला आद्रा नक्षत्राचे आगमन होत आहे. याला उंदराचे वाहन आहे. गावखेड्यात अशा योगाला पाणी समाधानकारक बरसणार असल्याचे भाकित सांगतात. सगळे बजेट शेतीवर अवलंबून असल्याने शासन, प्रशासन, शेतकरी पाऊस बरण्याची प्रतिक्षा करतो, असे कृषी विभागही चिंताग्रस्त झाल्या असून टिकेला पात्र ठरत आहे.
बियाणे विक्रीकरीता सज्ज असून पाऊस नसल्याने बियाणे विक्री थंड बसत्यात पडली आहे. विक्रीला ब्रेक लागला असून १२ ते १३ दिवसाच्या वाणाला अधिक पसंती मिळत् आहे. पिककर्ज घेवून शेतकरी चिंतातून झाला आहे. दुबारपेरणी टाळण्याकरिता शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहे.
महागडे बियाणे खरेदी करणे डोईजड असल्याने पेरणीकरीता विलंब होत आहे. पालांदूर मंडळ कृषी अंतर्गत १३८५.८४ हेक्टर क्षेत्राअंतर्गत खरीबाचा हंगाम अपेक्षित आहे.
मागील तीन वर्षाचा दुष्काळ दिसत असल्याने बळीराजा मनात खचला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून स्विकारलेला दुग्ध व्यवसाय रसातळाला जात आहे. दुधाला भाव नसल्याने आर्थिक गोची वाढली आहे. खराशीचे दर रोजच गगणाला भिडत व्यापारी मालामाल होत आहेत.
खासगी दुध व्यापारी संघाच्या पुढे जात सेवा पुरवित असल्याने खासगीतला व्यापार फोफावला आहे. मागीलवर्षी दुष्काळ पडला ५० टक्केच्या आत आणेवारी गंभीर झाली आहे,
परंतु पिकविमा मिळालाच नाही. मागील खीरपाचे नुकसान या खरीप हंगामात मिळणे गरजेचे आहे परंतू शासनाचे विमा कंपनीवर नियंत्रण नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. लोकप्रतिनिधी या विषयात बोलायला तयार नाही. (वार्ताहर)