तीन महिन्याची आगाऊ रक्कम भरल्यानंतरही महिन्याभराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:36+5:30
स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७० ते ७५ हजार रुपये शासन दरबारी जमा केले. मात्र एकच महिन्याचे धान वितरण करण्याचे निर्देश अन्न पुरवठा विभागाने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : लॉकडाऊनमध्ये शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यासाठी जीव मुठीत ठेवून धान्याची उचल करावी लागत आहे. दुसरीकडे राशन दुकानदारांना पैशांची तडजोड करीत प्रथमच तीन महिन्याचे आगाऊ रक्कम शासन जमा करण्याची वेळ आली . मात्र एका महिन्याचे धान्य वितरीत करण्यात आले. यात मोफत धान्य नाही. यामुळे सामान्य जनता व दुकानदार भरडला जात आहे. याकडे योग्य उपाययोजना करून शासन आदेशाप्रमाणे धान्य वितरीत करण्याची मागणी केली.
कोरोनाच्या प्रादूर्भावाने सध्या जगभर हाहाकार पसरलेला आहे. स्वत:ला घरातच लॉकडाऊन करून घेतले आहे. काम नसल्याने खिशात दमडी नाही. अशात स्वस्त धान्य कसे खरेदी करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांसह स्वस्त राशन दुकानदारांनाही पडला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७० ते ७५ हजार रुपये शासन दरबारी जमा केले. मात्र एकच महिन्याचे धान वितरण करण्याचे निर्देश अन्न पुरवठा विभागाने दिले.
शासनादेशाप्रमाणे दुकानदारांना तीन महिन्याचे मोफत धान्य का दिले नाही असा प्रश्न लाभार्थ्यांनी केला असता त्यांना उत्तर देण्यासाठी नाकीनऊ आले होते.
यातच सोशल डिस्टंस पाडणे व लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. महिन्याभराचे स्वस्त धान्य देण्याचे विचारत असल्याने दुकानदारांसह लाभार्थी त्रस्त झाले असून पुन्हा रांगा लाऊन मोफत धान्यासाठी येत आहेत.
शिधापत्रिकाधारक संभ्रमात
एप्रिल ते जून महिन्यासाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त नियतनानुसार तांदळाचा साठा मुक्त करण्याची सूचना भारतीय अन्न महामंडळास स्वतंत्रपणे देण्यात आली. शिधापत्रिकाधारकास रास्तभाव धान्य दुकानामधून तीन महिन्यांचे मोफत धान्य एकत्रित का देण्यात आले नाही येथे प्रश्न आहे. १० ते १५ दिवसानंतर लॉकडाऊन हटल्यास मग धान्य देण्याचे औचित्य काय राहणार?
शासनाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे कार्य करीत आहे. धान्यांच्या पुरवठानुसार सध्या महिनाभराचे धान्य वितरीत करण्यात येत आहे. मोफत धान्याचे वाटप १० ते १५ दिवसानंतर करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला धान्याची वितरण करणे गरजेचे आहे.
- मिलिंद बंसोड
जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी, भंडारा