इंधन दरवाढीविरोधात जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:24 AM2021-06-19T04:24:08+5:302021-06-19T04:24:08+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती कमी असूनही केंद्र सरकार काही महिण्यांपासून पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसची सतत दरवाढ करीत आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती कमी असूनही केंद्र सरकार काही महिण्यांपासून पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसची सतत दरवाढ करीत आहे. खाद्यतेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे देशातील सामान्य जनता, शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यात दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्य तेलाच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सरीता मदनकर यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरोज भुरे, मंजुषा बुरडे, ॲड. नेहा शेंडे, अश्विनी बुरडे, धनवंता बोरकर, पुण्यशीला कांबळे, वर्षा आंबाडारे, डॉ.पूर्णिमा वाहने, मीना गाढवे, प्रेरणा तुरकर, पमा ठाकूर, नंदा डोरले, ज्योती टेंभूर्णे, कीर्ती गणवीर, सविता सारवे, आरती राऊत, ललिता घोडीचोर, अनिता भोंगाडे, नीता टेंभूर्णीकर, रेखा राखडे, सविता चौधरी, मनोरमा गोस्वामी, ललिता घोडीचोर, लता मेश्राम, शेवंता कहालकर, वृंदा गायधने, प्रीती रामटेके आदी पदाधिकारी व महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.