अतिक्रमण हटविण्यासाठी पाथरीत मोर्चा
By Admin | Published: August 1, 2015 12:13 AM2015-08-01T00:13:07+5:302015-08-01T00:13:07+5:30
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने पाथरी पुनर्वसीत गावठाणातील अतिक्रमण तात्काळ काढून देण्यासंदर्भात हनुमान मंदीर पाथरी येथे गोसेखुर्द ...
चिचाळ : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने पाथरी पुनर्वसीत गावठाणातील अतिक्रमण तात्काळ काढून देण्यासंदर्भात हनुमान मंदीर पाथरी येथे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सहयोजक विलास भोंगाडे, सरपंचा रिना भुरे यांचे नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा हनुमान मंदिरातून प्रारंभ होऊन पुनर्वसन गावठाणात लहु खोब्रागडे यांचे अतिक्रमीत स्थळी येवून मोर्चा अडविण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर रस्ता रोको करून सभा घेण्यात आली. सभेला प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती सहयोग विलास भोंगाडे, सरपंचा रिना भुरे आदींनी संबोधित केले. शासनाने दिलेला आमचा हक्क कुणी हिसकावून नेत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही व संघर्ष करण्यासही मागे येणार नाही, असे सभेला मार्गदर्शन करताना विलास भोंगाडे म्हणाले, पाथरी पुनर्वसनावर गंभीर बाब अतिक्रमण आहे. अतिक्रमण रस्त्यावर केल्याने रस्ता, नाली व जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाथरी पुनर्वसन गावठाणातील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, पुनर्वसीत गावठाणातील शामराव बिलवणे यांची जागा त्वरीत भुसंपादन करून त्यांना मोबदला देवून जागा पाथरी गावठाणात समाविष्ठ करण्यात यावी, नखाते यांची जागा गावठाणात समाविष्ठ करण्यात यावी, पुनर्वसनात १८ नागरी सुविधाची पूर्तता करावी, पूनर्वसीत गावठाणाचे मोजमापण करून सिमांकन करण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार एम.यु. वाकलेकर यांना देण्यात आले.
यावेळी गोसीखुर्द संघर्ष समिती सहयोजक विलास भोंगाडे, सरपंचा रिना भुरे, धर्मराज भुरे, केशव हटवार, नंदलाल भुरे, दिगांबर कुर्झेकर, सोमेश्वर भुरे, विश्वनाथ वाडीभस्मे, किसन मरघडे, झिंगर भुरे, प्रभु लांजेवार, अरुण भुरे, परमेश्वर चंदनबावणे व मोठ्या संख्येत प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य मार्गावर तासभर प्रकल्पग्रस्तांनी रस्ता रोको आंदोलन केले. ठाणेदार अजाबराव नेवारे, पीएसआय विठ्ठल मोरे यांचे नेतृत्वात सहायक फौजदार अनिल नंदेश्वर, हवालदार दादा कठाणे, भाष्कर भोंगाडे, देवानंद सोनवाने, विकास जाधव, सुदर्शन घरडे आंदोलनस्थळी तैनात होते. (वार्ताहर)