बेरोजगार तरुणांचा अशोक लेलँड कारखान्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:54 PM2018-03-31T22:54:58+5:302018-03-31T22:54:58+5:30

अशोक लेलँड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना समाविष्ठ करुन घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे महासचिव शशीकांत भोयर यांच्या नेतृत्वात बेरोजगार युवकांनी अशोक लेलॅण्ड कारखान्यावर शनिवारला दुपारी मोर्चा काढला.

A morcha on unemployed youth Ashok Leyland factory | बेरोजगार तरुणांचा अशोक लेलँड कारखान्यावर मोर्चा

बेरोजगार तरुणांचा अशोक लेलँड कारखान्यावर मोर्चा

Next
ठळक मुद्देभिक नको हक्क हवा : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा बसपाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : अशोक लेलँड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना समाविष्ठ करुन घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे महासचिव शशीकांत भोयर यांच्या नेतृत्वात बेरोजगार युवकांनी अशोक लेलॅण्ड कारखान्यावर शनिवारला दुपारी मोर्चा काढला.
सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून करण्यात आली. मागण्या हक्काच्या, भीक नको हक्क हवा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. सन १९८२ - ८३ मध्ये भंडारा जिल्ह्यातील गडेगाव एमआयडीसीसाठी राजेगाव परिसरातील जमीन हस्तांतरीत करण्यात आली होती. त्या मोबदल्यात स्थानिक जमीन मालकांना मोबदला स्वरुपात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला एमआयडीसी प्रकल्पामध्ये नोकरी लावून देण्याच्या अटीवर स्थानिकांची शेतजमीन घेण्यात आली होती. परंतु स्थानिक लोकांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आले नाही.
यादरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमिनी संपादीत सर्व जमीनधारकांना नोकरी मिळण्यासंदर्भात पत्रव्यवहार करून पाठविण्यात आले होते. परंतु त्याची दखल राजेगाव एमआयडीसी येथील स्थापन करण्यात आलेल्या कंपन्यांनी घेतली नाही. त्यामध्ये अशोक लेलँड कंपनी ही मोठ्या प्रकारातील कंपनी असून याठिकाणी अजूनपर्यंत राजेगाव या गावातील स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात आले नाही.
अशोक लेलँड कंपनी लिमिटेड या कंपनीच्या हद्दीत राजेगाव येथील २६ एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने त्या ठिकाणी पक्के सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार राजेगाव गावाचा मिळणारा कर मागील सन १९८२-८३ पासून मिळाला नाही. त्यामुळे गावाचा विकास खुंटला, गावात कोणतेही प्रकारचे विकासकामे होऊ शकली नाहीत. या २६ एकर जमिनीचा कर अंदाजे दोन कोटी ४५ लाख ७० हजार रुपये ग्रामपंचायतीला कर स्वरुपात मिळाले असते. परंतु कंपनीच्या कर चुकवेगिरीमुळे कंपनीला माहिती देऊनही उत्तर मिळाले नाही. १३ आॅगस्ट १९९६ रोजी कर मागणीसंदर्भात नोटीस वा सूचनापत्र देऊनही कंपनी प्रशासनाने दखल घेतली नाही. आजपर्यंत कंपनीने अतिक्रमण केलेल्या जागेवर रितसर सिमेंटचे पक्के बांधकाम करून या जागेचा कर अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. सदर जमिनीचा कर ३० दिवसाच्या आत भरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सदर २६ एकर जागेची मोजणी ३ एप्रिल २०१८ रोजी होणार आहे. राजेगाव एमआयडीसी येथील बेरोजगारांना अशोक लेलँड कंपनीमध्ये नोकरी देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन व्यवस्थापक अरविंद बोरडकर यांनी स्वीकारले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे ताफ्याासह पोलीस बंदोबस्तात होते. आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी कंपनी प्रशासनाने घेतल्याने व वेळीच आंदोलकांची तीव्रता लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करण्याचे आवाहन केले. कारखाना व्यवस्थापन व आंदोलकांमध्ये अडीच तास चर्चा झाली. कंपनी प्रशासनाने तोडगा काढू व ग्रामपंचायतचे थकीत कर भरण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बसपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर, शरद वासनिक, बंडू मलोडे, आनंदराव गंथाडे, महासचिव शशीकांत भोयर, कुंजन शेंडे, राजेगावच्या सरपंचा अनिता शेंडे, शिलवंत रंगारी, निलेश नागदेवे, हितेश झंझाड, मार्कंड थोटे, अलोक शेंडे, वसंता वासनिक, मनोहर सार्वे, शालीक गंथाडे, अशोक शेंडे, अमरदीप गणवीर, देवांगणा खोब्रागडे, सागरता शेंडे, अनुरता वासनिक, सविता रामटेके यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते उपस्थित होते.

Web Title: A morcha on unemployed youth Ashok Leyland factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.