अधिकाधिक युवकांनी लसीकरण करून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:24+5:302021-06-24T04:24:24+5:30
मोहाडी : गत काही दिवसापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मोहाडी शहरातसुद्धा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला व अनेकांना आपले ...
मोहाडी : गत काही दिवसापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. मोहाडी शहरातसुद्धा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला व अनेकांना आपले आप्तजण गमवावे लागले. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात असल्याने कोरोनाला पळविण्यासाठी लस ही एकमात्र उपाय असल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून आपले जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन चंदू डेकाटे यांनी केले आहे.
देश-विदेशातील शास्त्रज्ञांनी कोरोनासोबत लढण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे लस असल्याचे सांगितलेले आहे. ग्रामीण भागात लसीबद्दल चुकीचे भ्रम पसरविण्यात आलेले असल्याने लसीकरणाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. परंतु कोरोना विरुद्धच्या लढाईत लस एकमात्र उपाय असल्याने, आजच्या युवकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन जनजागृती करावी व लस घेतल्याने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते, हे समजावून सांगणे गरजेचे आहे. लोकांच्या मनात असलेला भ्रम काढून टाकावा तसेच प्रत्येक युवकाने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डेकाटे यांनी केले आहे.